14 October 2019

News Flash

अभय परांजपे

संरक्षण यंत्रसामुग्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘टाटा लॉकहिड मार्टनि’च्या मुख्य परिचालन अधिकारी पदावर अभय परांजपे कार्यरत आहेत.

अभय परांजपे

अमेरिकेतील बोईंग कंपनी कडून भारताने २२ अ पाचे हेलीकॉप्टर तसेच लॉकहिड मार्टिनकडून १२ ‘सी १३० हर्क्युलस’ विमाने खरेदी केली. सन्यदलात माल वाहतुकीसाठी वापरली जाणारी ही हेलिकॉप्टर जरी अमेरिकेत जुळणी केली असली तरी या हेलिकॉप्टरच्या वेगवेगळ्या यंत्रणांपैकी काही मुख्य यंत्रणा भारतात हैदराबाद येथील ‘टाटा लॉकहिड मार्टनि’ने तयार केल्या आहेत. संरक्षण यंत्रसामुग्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘टाटा लॉकहिड मार्टनि’च्या मुख्य परिचालन अधिकारी पदावर अभय परांजपे कार्यरत आहेत. मूळचे पुण्याचे असलेल्या परांजपे यांचे वडील साराभाई केमिकल्स मधील नोकरी निमित्ताने बडोद्यास स्थायिक झाल्याने परांजपे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण बडोद्यात झाले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीतील पदवी मिळविल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

अमेरिकेत त्यांनी नोकरीची सुरवात हवा, पाणी व भूपृष्ठावर वापरल्या जाणाऱ्या संरक्षण यंत्रसामुग्रीचे उत्पादक असलेल्या ‘लॉकहिड मार्टनि’ या कंपनीमधून केली. पुढे याच कंपनीने त्यांच्यावर भारतासारख्या मोठय़ा संरक्षण उत्पादन खरेदीदाराच्या व्यवसाय विकासाची जबाबदारी सोपविली. दरम्यानच्या काळात टाटा सन्सने संरक्षण क्षेत्रातील बदलांची चाहूल घेत टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड (टीएएस) या कंपनीच्या माध्यमातून संरक्षण उत्पादन क्षेत्रात मुहूर्तमेढ रोवली. टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टिम्सच्या लॉकहिड मार्टनिसोबतच्या ७४:२६ टक्के संयुक्त भागीदारीत ‘सी १३० हक्र्युलस’, ‘लॉकहिड मार्टनि सी १३०जे हक्र्युलस’ आणि प्रसिद्ध ‘एफ-१६’ या विमानांसाठी ‘हक्र्युलस सेंटर विंग्ज बॉक्सेस’ आणि ‘अ‍ॅम्पेनेग्स’ या दोन महत्त्वाच्या सुटय़ा भागांची निर्मिती केली जाते.संरक्षण उत्पादनासाठी सार्वजनिक क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीस चालना देण्याचे सरकारने ठरविल्यानंतर भारतात सध्या जागतिक संरक्षण उत्पादकांसाठी महत्वाच्या सुटय़ाभागांचे उत्पादन केले जाते. संरक्षण उत्पादनांच्या बाजारपेठेत भारत सध्या महत्त्वाचा खरेदीदार आहे. भारताने अजून ‘एफ १६’ विमानांच्या खरेदीचा विचार जरी केला नसला तरी टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्सतर्फे ‘एफ १६’च्या सुटय़ा भागांच्या निर्मितीला सुरवात झाली आहे. परांजपे यांच्या मते भारत केवळ संरक्षण उत्पादनांचा खरेदीदार न राहता पुरवठादार होऊ शकतो. त्यासाठी भारताने केवळ स्वत:च्या वापरासाठी संरक्षण उत्पादनांचा विचार न करता जागतिक पातळीवर संरक्षण उत्पादकांसाठी महत्त्वाच्या सुटय़ाभागांचा उत्पादक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

First Published on May 14, 2019 12:08 am

Web Title: abhay paranjpe profile