मुंबई आणि तिचे हृदय असलेल्या शिवाजी पार्कचा मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबाचा हा सुपुत्र, आज जगाचा प्रगत हिस्सा असलेल्या बाजारांमध्ये गुंतलेल्या मोठय़ा हिश्शाचे प्रतिनिधित्व करतो. जगातील सर्वच महत्त्वाच्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचा व्यवहार आणि त्यांच्या अब्जावधींची उलटफेर त्यांच्या सल्ल्याने ठरते. आर्थिक महासत्ता असलेली अमेरिकेची सर्वात सामथ्र्यवान मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षा जॅनेट येलेन यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ आणि अमेरिकेच्या कोषागार मंत्र्यांसह महत्त्वाच्या सल्लामसलतीच्या बैठकांमध्ये त्याचा सहभाग असतो. होय, मराठमोळ्या अजय राजाध्यक्ष यांनी न्यूयॉर्कचा वॉल स्ट्रीट आणि वॉशिंग्टन डीसी या दोन सर्वशक्तिमान सत्ताकेंद्रांत सहज संचार शक्य केला आहे. जागतिक बृहत-संशोधन व सल्ला क्षेत्रातील संस्था बार्कलेज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक असलेले राजाध्यक्ष यांची अलीकडेच अमेरिकेच्या कोषागार विभागाने राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

दादरच्या हिंदू कॉलनीतील राजा शिवाजी संकुलातून शालेय शिक्षण, रुपारेल महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण ते मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण आणि आयआयएम कोलकातामधून एमबीए असे एक एक टप्पे त्यांनी सर केले. आयआयएम कोलकातानंतर त्यांनी अ‍ॅरिझोना येथील अमेरिकन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर पदवी मिळविली. हाच अजय यांचा अमेरिकेतील प्रवेशाचा बिंदू होता. एके ठिकाणी मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून अल्पकाळासाठी केलेल्या उमेदवारीनंतर, त्यांनी बेअर स्टर्न्‍सच्या तारण विभागात कारकीर्द सुरू केली. हा २००१ सालचा काळ होता. तेव्हा बेअर स्टर्नच्या तारण व्यवसायाचा जगभरात कित्ता होता आणि त्याकडे सर्वच आदर्श म्हणून पाहत असत. अर्थात २००८ सालातील अपकीर्तीच्या पूर्वी या संस्थेची प्रतिमा खूपच उज्ज्वल होती. अजय यांच्या सुदैवाने, बेअर स्टर्नमध्ये अरिष्टाला सुरुवात होण्यापूर्वीच म्हणजे २००५ सालात ते बार्कलेजमध्ये त्यांच्या एमबीएस फ्रँचाइजी व्यवसायाच्या उभारणीच्या जबाबदारीवर रुजू झाले. वयाच्या ३१ व्या वर्षी म्हणजे या व्यवसायात उतरल्यानंतर अवघ्या सहा वर्षांत ते व्यवस्थापकीय संचालक या पदावर पोहोचले. या दरम्यानच्या काळात अनेक यशाचे क्षण त्यांनी अनुभवले, तसेच विशेषत: जागतिक वित्तीय अरिष्टाच्या काळात त्यांच्या वाटय़ाला काही कसोटीचे क्षणही आले. त्यांच्या कंपनीने दिवाळखोर लेहमन ब्रदर्सचा व्यवसाय ताब्यात घेतला; परंतु अजय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संघ दोघेही या स्थितीतून अल्पावधीत सावरले आणि त्यांच्या पंखांनी पुन्हा विस्ताराची झेप सुरू केली. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची जबाबदारी ही वर्षांगणिक वाढतच गेली आणि आज वॉल स्ट्रीटवरील सर्वतोमुखी असलेले नाव बनेपर्यंत त्यांनी लौकिक स्थापित केला आहे. आजही केवळ चाळिशीत असलेला हा तरुण नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे.

Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
jalgaon bjp marathi news, eknath khadse marathi news
“एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा…”, गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य