स्वतला ईश्वरी अवतार मानून आपले बाजारमूल्य वाढविण्याची स्पर्धा भक्तीपंथात जोमाने फोफावलेली असताना आणि या स्पध्रेतूनच अनेक पाखंडी कलंकित होत असताना, शांती, संयम आणि औदार्य अशा त्रिगुणांच्या अनोख्या संगमामुळे बाबा हरदेव सिंहजी यांनी लाखो अनुयायी जोडले आणि मानवतेची पूजा करणारा निरंकारी पंथ जगभर फोफावला. संत निरंकारी मिशनमध्ये जगातील सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोिवदाने नांदतात, कारण कोणाच्याही व्यक्तिगत जीवनशैली किंवा श्रद्धा भावनांना धक्का न लावता केवळ मानवतेच्या आधारावर आपुलकी, प्रेम, सद्भावाने, सामंजस्याने व एकोप्याने आनंदाने जीवन जगायला शिकवणारी विचारधारा बाबा हरदेव सिंहजींनी जोपासली. बाबाजी यथार्थ व यशस्वी मानवी जीवन जगण्याची कला शिकवत असत. त्यांनी आध्यात्मिक व भौतिक जीवनाशी अशी सुंदर सांगड घातली, त्यामुळेच जगभर ही विचारधारा लोकप्रिय बनली.

संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या सामाजिक व आíथक परिषदेवर संत निरंकारी मंडळाला सल्लागाराचा दर्जा दिला.संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या सामाजिक व आíथक परिषदेवर संत निरंकारी मंडळाला सल्लागाराचा दर्जा दिला. २०१३ मध्ये बाबाजींना गांधी ग्लोबल फॅमिलीच्या वतीने प्रतिष्ठित महात्मा गांधी सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले, तर २०१४ मध्ये गांधी शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ ऑगस्ट, २०१५ रोजी इंग्लंडमध्ये स्वेच्छा सामाजिक सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सर्वोच्च ‘क्वीन्स गोल्डन ज्युबिली अ‍ॅवॉर्ड’ने बाबाजींना सन्मानित करण्यात आले. हरदेव सिंहजी महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९५४ रोजी दिल्ली येथे झाला. १९७१ मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि सेवादलाची सुती खाकी वर्दी घालून सेवेचा आनंद लुटला. १९७५ मध्ये त्यांनी ‘निरंकारी युथ फोरम’ची स्थापना केली. या फोरमचे लक्ष्य होते साधे व सदाचारी जीवन जगणे, प्रेम व भक्तिपूर्ण सेवा, अनावश्यक उधळपट्टीला आळा आणि नशाबंदी.  २४ एप्रिल १९८० रोजी कट्टरपंथी धर्माधांनी मिशनचे तत्कालीन प्रमुख, सद्गुरू बाबा गुरुबचन सिंहजी यांची हत्या केली. तरुण हरदेवांनी पिताही गमावला होता. निरंकारी मिशनच्या प्रत्येक अनुयायाचे धर्य, संयम आणि सहनशीलता पणाला लागावी असा तो क्षण होता.  २७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेव सिंहजी यांना मिशनचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्याचे आश्वासन कृतीत उतरविण्यासाठी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशन मानवता, विश्वबंधुत्व, प्रेम, शांती, समता, अिहसा अशी महान ध्येये गाठणारी आध्यात्मिक चळवळ बनून गेली आहे. या जून महिन्याच्या शेवटी होऊ घातलेल्या द्वितीय निरंकारी आंतरराष्ट्रीय संत समागमाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्याच्या उद्देशानेच ते कॅनडाच्या कल्याण यात्रेवर असताना त्यांची गाडी अपघातग्रस्त झाली. मानवतेचे कार्य करत असतानाच त्यांनी आपला देह ठेवला.

kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार