‘आयोवा राज्यासाठी आणि अमेरिकेसाठी मी नेहमीच माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन आणि आपणास अभिमान वाटेल असे पाहीन’ (आय विल डू माय बेस्ट फॉर आयोवा अ‍ॅण्ड द युनायटेड स्टेट्स अ‍ॅण्ड मेक ऑल ऑफ यू प्राऊड)- ट्विटर या समाजमाध्यमातून या शब्दांतील जाहीर, परंतु विनम्र ग्वाही स्वाती दांडेकर यांनी अमेरिकी देशबांधवांना तसेच आयोवा राज्याच्या रहिवाशांना २३ नोव्हेंबर रोजी दिली, त्यामागे कारणही तसेच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘आशियाई विकास बँके’वर अमेरिकी प्रतिनिधी म्हणून दांडेकर यांची नेमणूक २० नोव्हेंबरला केली. राजदूत दर्जाचे हे पद मिळाल्यानंतर अभिनंदनाच्या वर्षांवास उत्तर देताना आपल्या राष्ट्रासाठी -म्हणजे अमेरिकेसाठी- सर्वोत्तम काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करणे साहजिकच होते.

लोकोपयोगी कामात सहभागी होणे हे स्वाती दांडेकर यांच्या अंगवळणी पडले आहे. गेली सुमारे साडेतीन दशके त्या आयोवातील समाजजीवनात सक्रिय आहेत.. या सक्रियतेला मिळालेली अगदी पहिली छोटेखानी दाद म्हणजे, १९८२ साली त्यांचा ‘लिन-मार फाऊंडेशन वॉल ऑफ फेम’मध्ये झालेला समावेश. शालेय मुलांसाठी १०० तास मोफत शिकवण्याचा नेम वर्षांनुवर्षे पाळल्याबद्दल हा प्रतीकात्मक बहुमान होता. १९९६ मध्ये ‘लिन-मार फाऊंडेशन’च्या विभागीय शैक्षणिक अभ्यासक्रम समितीवर त्यांची नेमणूक झाली आणि खऱ्या अर्थाने समाजकारण सुरू झाले. यापुढले पाऊल म्हणजे राजकारण. आयोवाच्या लोकप्रतिनिधीगृहाची २००२ सालची निवडणूक त्या जिंकल्या, त्यानंतर २०११ पर्यंत लोकप्रतिनिधी आणि प्रतिनिधीनियुक्त प्रतिनिधी (सिनेटर) म्हणून, तर पुढेही २०१३ पर्यंत ‘आयोवा राज्य (सेवासुविधा) मंडळा’च्या सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. केंद्रीय लोकप्रतिनिधीगृहात जाण्यासाठी त्यांनी पद सोडले, पण प्राथमिक फेऱ्यांमध्ये यशाने हुलकावणी दिली. आयोवा राज्याच्या मानवी विकासाकडे लक्ष देणे त्यांनी त्यानंतरही थांबविले नाही. शिक्षण, नागरी सेवा यांच्या समन्यायी विकासासाठी त्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व सिनेटर या नात्याने प्रयत्न केले होतेच.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

नागपूर विद्यापीठातून १९७१ साली जीवशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत पदवी (बी.एस्सी.) घेऊन, मुंबई विद्यापीठाची पोषणतज्ज्ञ (डाएटिक्स) पदविका त्यांनी १९७२ मध्ये मिळविली. मात्र भारतातील कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच- १९७३ साली पती अरविंद यांच्यासह त्यांना अमेरिकेस जावे लागले. तेथील नागरिकत्व मिळवून त्या राजकारणात आल्या. त्यांची दोन्ही मुलेही अमेरिकेतच स्थायिक आहेत.