जन्म अमेरिकेतील असला तरी भारतीयत्वाची नाळ कायम जोडून ठेवणारे डॉ. अतुल गावंडे मूळचे यवतमाळ जिल्ह्यतील उमरखेडजवळच्या उटीचे. या गावातील पहिले डॉक्टर होण्याचा मान अतुल यांचे वडील आत्माराम गावंडे यांनी मिळवला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या गावंडेंनी उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली व तिथेच ओहिया प्रांतात स्थायिक झाले. ऑक्सफर्डमधून पदवी तर हार्वर्डमधून लोक आरोग्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉ. अतुल पहिल्यांदा प्रकाशझोतात आले ते त्यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे. वैद्यकीय क्षेत्रातील नफेखोरी असा त्याचा विषय होता. या लेखाने अमेरिकेत खळबळ उडाली. वाद-प्रतिवाद झडले. त्यापासून प्रेरणा घेत डॉ. अतुल यांनी याच विषयावर भविष्यात अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

वैद्यकीय उपचाराचा दर्जा व खर्चाचे प्रमाण व्यस्त कसे यावर संशोधन करत त्यांनी ‘सर्जिकल कॉम्प्लिकेशन’ यासह अनेक पुस्तके लिहिली. आधी न्यूयॉर्कर व नंतर न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्यांनी चालवलेली सदरे कमालीची लोकप्रिय ठरली. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते अल् गोर यांनी त्यांना राजकीय वर्तुळात आणले. एका निवडणुकीत त्यांचे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या अतुल यांना बिल क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या प्रशासनात आरोग्यविषयक सल्लागार म्हणून नेमले. अमेरिकेत नाव मिळवले तरी गावंडे कुटुंबांनी भारताशी नाते कायम ठेवले. त्यांच्या वडिलांनी उमरखेडला तीस वर्षांपूर्वी गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय सुरू केले. त्याच्या उभारणीत अतुल यांचे मोठे योगदान राहिले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तरीही ते नियमितपणे या शिक्षणसंस्थेला भेट देत असतात. या संस्थेतील विद्यार्थ्यांना ‘रोटरी एक्स्चेंज प्रोग्राम’च्या माध्यमातून अमेरिकेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, ईलर्निगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगाशी जोडणे असे अनेक प्रयोग डॉ. अतुल यांनी उमरखेडच्या संस्थेत सुरू केले आहेत. मामा डॉ. यादव राऊत यांच्या समन्वयातून त्यांनी या तालुक्यातील काही आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारासाठी अत्याधुनिक सोयीसुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोग्यविषयक प्रश्नावर स्लेट या ऑनलाइन मासिकासाठी अजूनही नियमित लेखन करणाऱ्या अतुल यांनी भारतातील अनेक वैद्यक परिषदांनासुद्धा हजेरी लावली आहे. अ‍ॅमेझान, बर्कशायर हॅथवे व जेपी मार्गन चेस या तीन कंपन्यांनी एकत्र येत आरोग्य क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या कंपनीचे प्रमुख म्हणून येत्या जुलैमध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर कमी पैशात चांगली उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचे आव्हान डॉ. गावंडे यांच्यासमोर असणार आहे.

Union minister Piyush Goyal, BJP’s candidate for Mumbai North, interacts with supporters. (Express photo by Sankhadeep Banerjee)
पियूष गोयल यांच्या पहिल्याच प्रचारसभेत घुमला मतदारांचा सूर, “मुंबईचा आवाज आता दिल्लीत!”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल