व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी कमला यांची ओळख केवळ प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते अशा स्वरूपाची नव्हती. आर. के. लक्ष्मण यांच्यातील कलाकाराला सतत प्रेरणा देण्याचे काम तर त्यांनी केलेच, पण स्वत:ची वेगळी ओळखही जपली होती. पु. ल. देशपांडे यांच्यातील प्रतिभा ज्याप्रमाणे सुनीताबाईंनी त्यांचा लहरी स्वभाव सहन करीत फुलवली, तेच काम कमला यांनी आर. के. यांच्या जीवनात पार पाडले. कमला या आर. के. लक्ष्मण यांची मामेबहीण. त्या अगदी तान्हय़ा असतानाच, त्या वेळी पाच-सहा वर्षांचे असलेल्या आर. के. यांनी त्यांच्याशीच विवाह करणार असे जाहीर केले तेव्हा घरचे सारे हसू लागले होते! पुढे आर. के. यांचा विवाह भरतनाटय़म नृत्यांगना कमलाकुमारी यांच्याशी झाला, परंतु या प्रथम पत्नीच्या निधनानंतर या कमला यांची साथ त्यांना मिळाली.
पतीच्या प्रसिद्धीवलयात कमला झाकोळून गेल्या नाहीत, हे विशेष. कमला यांची बौद्धिक उंची, कलेची जाण व प्रेम पतीएवढेच होते यात शंका नाही. त्यांचा जन्म चेन्नईचा. त्यांचे शिक्षण सेंट थॉमस कॉन्व्हेंटमध्ये झाले, तर दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून त्या पदवीधर झाल्या. अंतर्गत सजावटविषयक अभ्यासक्रमही त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून पूर्ण केला होता. मुलांसाठी त्यांनी तेनाली रामनच्या चातुर्यकथांची पुस्तके लिहिली होती. आर. के. यांचा चित्रसाज असलेली ही कथामाला १९७० मध्ये इंडिया बुक हाऊसने प्रकाशित केली होती. त्यावर आधारित मालिकाही दूरदर्शनवर सादर झाली.
आर. के. यांना २००३ मध्ये पक्षाघाताचा झटका आला तेव्हा तर त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. पक्षाघातामुळेच २०११ मध्ये वाचाही गेली, तरीदेखील आर. के. यांचे असंख्य चाहते त्यांच्या भेटीला येत असत. तेव्हा आर. के. त्यांच्या देहबोलीतून काय विचार सांगत आहेत हे बरोबर ओळखून अभ्यागतांना सांगणाऱ्या ‘दुभाषी’ कमलाच असत. आर. के. यांचे प्राणच कलेत गुंतलेले आहेत हे कमलाताईंना पक्के माहीत होते. त्यामुळे रोज त्या त्यांना चित्रे काढायला लावत असत, कारण तीच त्यांच्यासाठी खरी उपचार पद्धती होती. त्या नेहमी म्हणायच्या, की देवाने जे दिले त्यासाठी मी त्याची खूप आभारी आहे. देवाने मला जो पती दिला तो केवळ बुद्धिमान, वलयांकित होता म्हणून नव्हे, तर एखाद्या पत्नीला हेवा वाटावा असा माणूस पती म्हणून देवाने मला दिला याबद्दल मी आभारी आहे.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला