जगातील स्त्रीवादाला नवी कलाटणी देणाऱ्या बंडखोर लेखिका व कलाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ या पुस्तकाने त्यांना नाव मिळवून दिले. या अमेरिकी लेखिका म्हणजे केट मिलेट. त्यांच्या ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ या पुस्तकाची अफाट विक्री झाली होती. त्यात स्त्री-पुरुष यांच्यातील संबंधांचे राजकारण हा विषय होता. त्यांच्या मते यात एक गट दुसऱ्या गटाला नियंत्रित करीत असतो त्यामुळेच स्त्रियांना बंधनांचा, अन्यायाचा सामना करावा लागतो. याशिवाय त्यांची ‘प्रॉस्टिटय़ूशन पेपर्स’, ‘फ्लाइंग’ व ‘सीता’ ही पुस्तके  विशेष गाजली होती.

मिलेट यांचा जन्म मिनेसोटा येथे झाला तर त्यांचे शिक्षण कला शाखेत ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. त्यानंतर त्यांनी लेखिका व कलाकार म्हणून वाटचाल सुरू केली. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहित्यावर आधारित शोधनिबंध लिहिला होता. त्यातच ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ या पुस्तकाची बीजे होती. पुरुषसत्ताक पद्धती व त्यांचे रचनात्मक परिणाम यांचा बारकाईने अभ्यास त्यांनी केला होता. पुरुषांचे वर्चस्व हे इतर राजकीय जातकुळीसारखेच असते व ते शारीरिक क्षमतांवर नव्हे तर मूल्यपद्धतीने रुजलेले असते. त्यात खरे तर जैविकतेचा काही संबंध नसतो असे त्यांनी म्हटले होते. स्त्रीवादाची पहिली लाट आली ती थोडीशी मर्यादित व व्यवस्थेंतर्गत बंडाशी संबंधित होती व ती तिच्याच वजनाने कोसळली. दुसरी लाट मात्र क्रांतिकारी होती, ती लाट केट मिलेट यांच्यामुळेच सगळ्यांच्या लक्षात राहिली. कारण त्याच या लाटेच्या शिल्पकार होत्या. बर्नार्ड कॉलेज येथे शिक्षक असताना विद्यार्थी आंदोलन संघटित केल्याने त्यांना १९६८ मध्ये नोकरीतून काढण्यात आले होते. त्यांच्या ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ या पुस्तकाच्या १० हजार प्रती पंधरा दिवसांत विकल्या गेल्या व एकूण सातहून अधिक आवृत्त्या निघाल्या. त्यांचे हे पुस्तक म्हणजे स्त्रीमुक्तीचे बायबल मानले जाते. त्यांनी जे काम केले त्यामुळेच आज कायदेशीर गर्भपात, व्यावसायिक समानता, लैंगिक स्वातंत्र्य हे सगळे महिलांना मिळू शकले. त्यांची ‘दी पॉलिटिक्स ऑफ क्रुएल्टी’ व ‘मदर मिलेट’ ही आणखी दोन पुस्तके उल्लेखनीय आहेत. नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर विमेन, न्यूयॉर्क रॅडिकल विमेन, रॅडिकलेस्बियन्स या संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यांनी त्यांच्या ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ या पुस्तकात डी. एच. लॉरेन्स, हेन्री मिलर, नॉर्मन मेलर या कादंबरीकारांच्या लेखनाचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून समाचार घेतला होता. त्यांच्या या पुस्तकाला उत्तर देण्यासाठी नॉर्मन मेलर यांनी ‘दी प्रिझनर ऑफ सेक्स’ हे पुस्तक लिहिले होते. ‘गोइंग टू इराण’ या पुस्तकात त्यांनी इराणमधील महिलांच्या दडपशाहीचे वर्णन केले आहे. एकूणच त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा या स्त्रियांची प्रत्येक क्षेत्रात होणारी छळवणूक व दडपशाही याच होत्या. त्या कलाकारही होत्या. ‘दी ग्रेट अमेरिकन लेस्बियन आर्ट’ या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. ब्रिटनमध्ये दूरचित्रवाणीवर ‘आफ्टर डार्क’ नावाचा एक कार्यक्रम होता त्यात ऑलिव्हर रीड हा अभिनेता मध्यंतरात दारू प्याला व त्याने मिलेट यांच्याशी आगळीक करून त्यांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्याला बाजूला ढकलले पण नंतर ती टेप मागून घेतली व माझ्या मित्रांच्या करमणुकीसाठी मी ती वापरेन असे सांगितले होते. काही काळ त्यांना नैराश्यानेही घेरले, पण नंतर त्यांची स्थिती सुधारली. पॅरिस येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या असतानाच परवा त्यांचे निधन झाले. मिलेट यांच्या जाण्याने स्त्रीवादाचे दुसरे महायुद्ध काळाच्या पडद्याआड गेले आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान