रस्तारुंदीत घर पाडले गेल्यावर जपानी सरकारने भरपाई दिली, त्या पैशातून युरोपात जायचे ठरवून ते योकोहामाहून एका मालवाहू जहाजात चढले. हाँगकाँग, सिंगापूर, कोलंबो, मुंबई, जिबूटी असे करीत इजिप्त आणि स्पेनमार्गे जहाज मार्सेय (रूढ मराठी उच्चार मार्सेलिस) बंदरात पोहोचले.. तिथून कुठे जायचे हे माहीतच होते.. पॅरिस! ही गोष्ट १९६४ सालची. जपानमध्ये मध्यमवर्गीय घरात जन्मलेले, फॅशन डिझायनिंग या तेव्हा ‘मुलींचे’ मानले जाणाऱ्या क्षेत्रात शिकलेले केन्झो तकाडा तेव्हा होते २५ वर्षांचे. वयाच्या ८१ व्या वर्षी, ४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले, तेव्हा पॅरिसच्या फॅशनची शान वाढवणारा ‘फ्रान्सचा सुपुत्र गेला’ अशी हळहळ व्यक्त झाली. एवढे काय होते त्यांचे कर्तृत्व?

‘केन्झो’ हे जगप्रसिद्ध फॅशन लेबल त्यांनी स्थापन केले. ते १९९३ मध्ये ‘लुइ व्हुताँ’सह दोन कंपन्यांच्या महाकाय ‘एलव्हीएमच’ समूहाने विकत घेतले, तेव्हा ‘केन्झो’ची किंमत होती आठ कोटी डॉलर. केन्झो ज्या जपानहून आले, तिथले रंग आणि तिथली कलाजाणीव त्यांनी सोबत आणली होती हे खरे, पण  त्याहीपेक्षा केन्झो यांना तारुण्यसुलभ आकर्षण होते, ते जगाला एक मानणाऱ्या हिप्पी चळवळीतील रंगांचे. हे रंग नेमके हेरून  फॅशनजगतात आणण्याचे काम केन्झो यांनीच यशस्वीपणे आणि प्रभावीपणे केले, असे जाणकार सांगतात. केन्झो यांना त्या रंगांशिवाय आणि रंगरेषांच्या उन्मुक्तपणाशिवाय हिप्पी चळवळीशी देणेघेणे नव्हते. त्यांनी हिप्पीवर्तनाचा संबंध जंगलीपणाशी जोडला, प्राणीप्रेम आणि निसर्गप्रेम यांना आवाहन केले. १९६९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या पहिल्या ब्रॅण्डचे नावही ‘जंगल जॅप’ असेच होते. यातील ‘जॅप’ म्हणजे जपानी. अमेरिकेत त्या नावास जपानच्या व्यापारसंघटनेने आक्षेप घेतला. तो अमेरिकी न्यायालयांनी रद्द केला आणि जपानी कपडे असेच असले पाहिजेत, हा आग्रहदेखील भिरकावला गेला!

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
us artist richard serra personal information
व्यक्तिवेध : रिचर्ड सेरा
girl torture Dombivli
डोंबिवलीतील फडके रोडवरील पाळणाघरात केंद्र चालकांकडून लहान मुलीचा छळ

रेखाचित्र काढल्यासारख्या रेषा, स्फोट झाल्यासारखे रंग, संथपणापेक्षा लगबगीतले लालित्य, यांवर केन्झो यांचा भर राहिला. हे सारे युरोपलाही नवे होते, कारण तोवर भडक वा ताजे रंग युरोपात रुळले असले, तरी एकरंगी-दुरंगीपणा कायम होता. केन्झो यांनी युरोपीय फॅशनला बहुरंगी करण्यातही योगदान दिले. निराळ्या, आशियाई  संस्कृतीतून येऊन पॅरिसमध्ये स्थिरावणारा हा पहिला फॅशन डिझायनर, पुढे अनेकांचे प्रेरणास्थान ठरला. मात्र तोवर कपडय़ांप्रमाणेच सुगंधाच्या व्यवसायातही केन्झो यांनी नाममुद्रा उमटवली. ‘अ‍ॅव्हॉन’ हा ब्रॅण्ड भारतीयांना माहीत असतो, त्याच्याशीही केन्झो यांचा संबंध होता, पण १९९९ पासून ते निवृत्त आयुष्य जगत होते!