29 March 2020

News Flash

जयराम कुलकर्णी

जयराम ज्या चित्रपटांमधून काम करत असत ते चित्रपट नेहमी हिट होत.

चरित्र अभिनेत्यांना आता कधी नव्हे इतके  महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ऐंशी-नव्वदच्या दशकांत विशेषत: मराठी चित्रपटांमध्ये जेव्हा हिरो-हिरॉईन, खलनायक, हिरॉईनचा भाऊ आणि हिरोचा मित्र इतक्या मर्यादित भूमिकांचे जग होते, त्या काळात आपल्याला मिळालेल्या भूमिके तून आपली दखल घ्यायला लावणारे काही मोजके च चेहरे होते. मराठी चित्रपटांमध्ये असा एक हसतमुख चरित्रनायकाचा चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयराम कु लकर्णी कायम रसिकांच्या स्मरणात राहतील.

बार्शीतला जन्म, शालेय शिक्षण घेत असल्यापासूनच लागलेली अभिनयाची गोडी आणि पुढे स. प. महाविद्यालयात शिकत असताना नाटकाशी जुळलेल्या तारा या प्रवासातून त्यांच्यातला कलाकार घडत गेला. त्यांची चित्रपट कारकीर्द काहीशी उशिराच, त्यांच्या चाळिशीत सुरू झाली. त्याआधी आकाशवाणीच्या श्रुतिका आणि प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए)ची नाटके यांतून ते रंगभूमीवर सक्रिय होते. मराठी चित्रपटसृष्टीतील तो काळच मुळात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या चौकडीचा. जयराम कु लकर्णी यांची गट्टी महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्याशी जमली. त्यामुळे त्यांच्या बहुतांशी चित्रपटांतून जयराम वेगवेगळ्या भूमिकांमधून लोकांसमोर आले. कधी इन्स्पेक्टर, कधी कमिशनर, कधी तात्या, कधी इनामदार. त्यातही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिके तील त्यांची रूपे सहजपणे डोळ्यासमोर तरळतात. ‘धूमधडाका’, ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट..’ अशा दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांतून त्यांनी कामे के ली.

त्या काळी मराठी चित्रपटांसाठी सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली.. ही यशाची परिमाणे होती. जयराम ज्या चित्रपटांमधून काम करत असत ते चित्रपट नेहमी हिट होत. त्यामुळे त्यांना कौतुकाने मराठी चित्रपटांतील राजेंद्र कु मार असे संबोधले जाई, अशी आठवण सिनेअभ्यासक सांगतात. मात्र महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्या यशामागे जयराम कु लकर्णी यांच्यासारख्या चरित्र अभिनेत्यांचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या सहज अभिनयाने त्यांनी चित्रपटांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण के ले होते. त्यांची उशिरानेच सुरू झालेली चित्रपट कारकीर्द मराठी चित्रपटसृष्टीच्या त्या बहरत्या काळाबरोबर सुखाने नांदली आणि प्रेक्षकांना या हसतमुख चरित्रनायकाचे काही चमकदार क्षण आठवण म्हणून देऊन गेली.. तो काळ आता सरला, जयराम यांचेही निधन मंगळवारी (१७ मार्च) झाले, तरीही या आठवणी ताज्या राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 2:00 am

Web Title: marathi actor jayram kulkarni profile zws 70
Next Stories
1 डॉ. मुबाशिर हसन
2 महादेश प्रसाद
3 प्रा. मधुकर वाबगावकर
Just Now!
X