श्रीमंतांच्या, सरकारी उच्चपदस्थांच्या मुलांना पैशाने हवे ते शिक्षण मिळू शकते; छंद वाढवण्यासाठी घरून किती तरी मदत होते, कशालाच पैसा कमी पडत नाही, ‘मी अमुक-अमुक होणार’ असे लहानपणीच श्रीमंतांच्या मुलांनी ठरवावे आणि त्यांच्या बडय़ा पालकांनी ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी आणखी पैसा खर्चावा, हेही नेहमीचेच.. मारिओ मोलिना यांचे बालपण, अगदी श्रीमंतीच होते. तरीही त्यांच्या निधनाची दखल जगाने तातडीने घेतली, ती रसायनशास्त्रात महत्त्वाचे संशोधन करणारे ‘नोबेल’ मानकरी म्हणून! सुखी बालपणातही रसायनशास्त्राची आवड तळमळीनेच जपणारे आणि ‘रसायनशास्त्र संशोधकच व्हायचे’ असा निश्चय वयाच्या ११व्या वर्षी (सन १९५४) करणारे मारिओ मोलिना मात्र १९९५ मध्ये ‘नोबेल’ मानकरी ठरले. त्या वर्षीचे नोबेल तिघांना विभागून देण्यात आले होते आणि १९७० मध्ये बीजरूपात मांडल्या गेलेल्या सिद्धांतावर पुढील संशोधन त्यांनी १९७५ मध्ये केले होते. हे संशोधन आजही उपयुक्त ठरते, कारण ते होते ‘ओझोन थरा’ला विरळ करणाऱ्या वा छिद्र पाडणाऱ्या ‘क्लोरोफ्लूरोकार्बन्स’ (सीएफसी) वरील पहिले निर्णायक संशोधन.

मारिओ यांचे वडील मेक्सिकोतील क्रांतिकारी पक्षाच्या सत्ताकाळात, मेक्सिकन राजदूत म्हणून पौर्वात्य देशांत होते. कळू लागले तेव्हापासून मारिओ यांना रसायनशास्त्राची, प्रयोगांची आवड होती आणि त्यांनी घराच्या एका न्हाणीघरात रीतसर साहित्य आणवून प्रयोगशाळाही स्थापली होती. ‘घराण्याच्या परंपरेप्रमाणे’ त्यांना युरोपात शिक्षणासाठी धाडण्याचे ठरले, तेव्हा स्वित्झर्लंडच्या निवासी शाळेची निवड त्यांनी केली. मात्र, ‘युरोपातील मुलेही मेक्सिकन मुलांसारखीच- रसायनशास्त्रात कुणाला रसच नाही’ म्हणून खट्ट झाले. आपणही व्हायोलिनवादकच व्हावे काय, असा विमनस्क विचारही करू लागले. मायदेशी परतूनच त्यांनी रसायनशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केले, पण पुढे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले. फिजिकल केमिस्ट्रीतील संशोधनात इलेक्ट्रॉनिक, इन्फ्रारेड उपकरणांचा कल्पक वापर करण्याचे तंत्रही ते शिकले. १९७३ मध्ये शेरवूड रोलँड यांच्या संशोधनगटात सहभागी झाले. त्याआधी १९७० मध्येच पॉल क्रुट्झेन यांनी, ‘ओझोन’वर नायट्रिक ऑक्साइडसारख्या घटकांची अभिक्रिया होऊन ओझोनचे रूपांतर साध्या ऑक्सिजनमध्ये होते, म्हणजे तीनपैकी एक ऑक्सिजन-अणू नष्ट होतो, असा सिद्धान्त मांडला होता; त्यावर रोलँड आणि मारिओ यांनी काम केले, त्यासाठी दक्षिण ध्रुवीय मोजमापे घेऊन त्यांनी ‘सीएफसी’च्या संहारकतेला रसायनशास्त्रीय बैठक दिली. ‘नोबेल’साठी मात्र २० वर्षे थांबावे लागले.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Loksatta anvyarth Two parties join India from Jammu and Kashmir to fight against BJP Farooq Abdullah National Conference Mehbooba Mufti PDP
अन्वयार्थ: भाजपेतर ‘इंडिया’तील घटकपक्षांच्या टवाळक्या
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत