कलाकाराच्या जीवनप्रवासात संघर्ष बहुतेकदा असतोच, त्याला चित्रकार सूर्यप्रकाश हेही अपवाद नव्हते. अगदी कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी चित्रकलेच्या प्रांतात नाव कमावले, तरुण चित्रकारांनाही प्रोत्साहन दिले. त्यांच्या निधनाने नव्या दमाच्या चित्रकारांची प्रेरणा असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचा जन्म खम्मम जिल्ह्य़ातील मधिराचा. हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स अँड आर्किटेक्चर या संस्थेतून त्यांनी पदविका घेतली. त्यानंतर दिल्लीत राम कुमार आदींच्या देखरेखीखाली चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आणि हैदराबादेत परतल्यावरच त्यांची कारकीर्द घडली. त्यात त्यांचे मित्र लक्ष्मा गौड व डाकोजी देवराज हे साक्षीदार ठरले.

सुरुवातीच्या काळात त्यांनी हैदराबादेतील अरुंद गल्ल्यांचे रूप चित्रातून रेखाटले, नंतर निसर्ग ही त्यांची कलाप्रेरणा ठरली. त्यात रोजच्या जीवनातील पाने-फुले, उद्याने यांचा समावेश होता. भारतीय कला प्रशिक्षणात केवळ आकृतीकरणाला (फिगरेशन) महत्त्व होते. त्याला त्यांचा विरोध होता. त्यातून त्यांनी अर्ध-अमूर्त निसर्गचित्रांचे प्रयोग केले. सहा दशकांत त्यांनी साकार केलेल्या कलाकृती या ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट रिअ‍ॅलिटी’ या पुस्तकात संकलित केलेल्या आहेत. त्यांच्या चित्रातील फटकाऱ्यांनी एकमेकांवर आच्छादलेले रंग ही वेगळी वैशिष्टय़े ठरली. त्यांची चित्रप्रदर्शने दिल्ली, मुंबई व परदेशातही झाली होती. प्रकाश यांचा प्रवास खडतर होता. ते सुरुवातीला एका लहानशा गॅरेजमध्ये राहून चित्रे काढत असत. १९६० च्या सुमारासचा तो काळ. आंध्र प्रदेशच्या माहिती व जनसंपर्क विभागात काम करताना त्यांना काही चित्रप्रदर्शने करण्याची संधी मिळाली होती. तैल व अ‍ॅक्रिलिक रंगात त्यांनी चित्रे केली. त्यांच्यावर फ्रेंच चित्रकारांचा प्रभाव दिसून येत होता. अमूर्त (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) चित्र शैलीचा प्रभाव मान्य करूनही ते पाना-फुलांत अधिक रमत असत. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संस्थापक संचालक पीएम भार्गव यांनी सूर्यप्रकाश यांना त्यांच्या संस्थेत ‘निवासी कलाकार’ म्हणून नेमले. तेथे त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी मोठय़ा जागेची व्यवस्थाही केली. त्यानंतर एल. व्ही. प्रसाद नेत्र संस्थेचे संस्थापक जी. एन. राव यांनीही त्यांच्या कलेचा आदर करीत त्यांना कलासज्जतेसाठी जागा दिली. तेथे ३० वर्षे सूर्यप्रकाश यांनी काम केले. जर्मनी, टोकियो, लंडन येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली. नंतरच्या काळात श्रीनगर कॉलनी रोड येथील त्यांच्या निवासस्थानीच असलेली ‘सूर्या आर्ट गॅलरी’ हा अनेक कलाकारांचा अड्डा होता. हैदराबादला त्यांनी कला क्षेत्रात देशाच्या नकाशावर आणले.

Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…