१९४८साली मराठवाडा निजामी जोखडातून मुक्त झाल्यानंतर, एरवी स्थितीशील असणाऱ्या त्या काळच्या या प्रदेशातील जीवनावर जे तरंग उमटले त्याचे चित्रण करणाऱ्या काही मोजक्याच लेखकांमध्ये ज्येष्ठ लेखक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचे स्थान ठळक आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने यापूर्वी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ कवी/अनुवादक चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांना दिलेला ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा ‘तुशं’ यांना जाहीर करून त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे.

जेव्हा ‘तुशं’ आपली कथा लिहीत होते तेव्हा मराठीत नवकथेने आपला दबदबा निर्माण केला होता. त्याचवेळी अनेक कथा लेखक फडके-खांडेकरी वळणाच्या प्रभावाखालीही येत होते. ‘तुशं’ मात्र स्वतच्या कथेची वेगळी पायवाट निर्माण करीत होते. मराठवाडय़ाचे समाजमन चित्रित करणारी त्यांची कथा प्रादेशिकतेचेही प्रतिनिधित्व करीत होती आणि स्वतला नवकथेशीही जोडू पाहत होती. ‘तृणाची वेदना’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९५५ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘कानोसा’ हा त्यांचा कवितासंग्रहही आहे. कथालेखन, कविता, समीक्षा, संपादन अशा अनेकविध क्षेत्रांत ‘तुशं’ यांनी काम केले. ‘तृणाची वेदना’ या कथासंग्रहाला प्रस्तावना लिहिताना नरहर कुरुंदकर यांनी ‘तुशं’ यांच्याशी झालेल्या पहिल्याच परिचयात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन विशेष सांगितले. ‘एक म्हणजे, त्याचे वाचनाचे वेड आणि दुसरी त्याची विलक्षण आत्मनिष्ठा..’ नरहर कुरुंदकर आणि ‘तुशं’ हे दोघेही समकालीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासूनचे मित्र. ही मत्री कुरुंदकरांच्या शेवटच्या श्वासापर्यंत होती. औरंगाबादेत १० फेब्रुवारी १९८२ रोजी एका व्याखानासाठी आलेल्या कुरुंदकरांना मृत्यूने गाठले तेव्हा त्यांनी शेवटचा श्वास ‘तुशं’ यांच्या मांडीवरच सोडला.

Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
arvind kejriwal arrets
केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

लेखनासोबतच ‘तुशं’ यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यातही मोठे योगदान दिले. कार्यवाहपदाची जबाबदारी १५ वष्रे सांभाळली आणि ‘प्रतिष्ठान’ या ‘मसाप’च्या मुखपत्राचे संपादनही या सर्व काळात केले. १९९२ साली झालेल्या परभणी जिल्हा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. औरंगाबाद येथे झालेल्या तेविसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. वयाची ८० वष्रे लोटल्यानंतर आजही त्यांचे वाचन चालू आहे. नव्या पिढीतील लेखकाचे काही चांगले वाचल्यानंतर त्या लेखकाला आवर्जून कळविण्याबाबतची स्वागतशील वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. नोकरीच्या निमित्ताने केलेले भटकंती व प्रवास लक्षात घेता एका भाषणात त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांची जगण्याबद्दलची उत्कटताच सांगणारी आहे. ‘गाव तेच असलं तरी आकाश रोज नवं असतं, नवं असतं म्हणूनच परकंही असतं..’ मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ही अशा समृद्ध जीवन प्रवासाला दिलेली दाद आहे.

(((   प्रा. तु. शं. कुळकर्णी  ))