दक्षिण कोरियात वाय. एस. या संक्षिप्त नावाने ते ओळखले जात. त्यांच्या कारकीर्दीत काही उणिवा होत्या, तरी दक्षिण कोरियाचे ते भाग्यविधाते होते.त्यांचे नाव माजी अध्यक्ष किम युंग साम. त्यांच्यानिधनाने त्या देशातील हुकूमशाहीशी झुंज देणारालोकशाहीवादी नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.ब्लू हाऊस या अध्यक्षीय प्रासादात ते पहिल्यादिवशी आले तेव्हा रात्रीच त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जुन्या घरातून जॉिगगचे बूट आणायला सांगितले होते.रोज पहाटे पाच वाजता जॉिगग, पाऊस, हिमवृष्टीचा आनंद घेणे हा त्यांचा दिनक्रम होता. एक वेळ मेंदू (विचार) भाडय़ाने घेता येईल, पण प्रकृती विकत मिळत नाही, असे ते म्हणायचे. आज दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यात राजकीय, सामाजिक व आíथक स्थितीत जो जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्याच्या मागे किम यांनी दक्षिण कोरियात केलेल्या राजकीय व आíथक सुधारणा हे एक प्रमुख कारण आहे. १९९३-१९९८ हा त्यांच्या अध्यक्षपदाचा काळ

तसा फार मोठा नाही, पण तरीही त्यांनी दक्षिण कोरियाला दिशा दिली. १९६०-१९८० या काळात तेथे हुकूमशहांची सत्ता होती, त्यावर किम यांनी नेहमीच टीका केली होती. किम यांचा जन्म १९२७ मध्ये गिओजे येथे एका मच्छीमार कुटुंबातला. वयाच्या २६ व्या वर्षी ते संसदेवर निवडून आले. बंडाने सत्ता मिळवणाऱ्या
पार्क चुंग यांच्यावर टीका करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे पार्क यांनी किम यांना संसदेतून
काढून टाकले होते. नंतर किम यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी मोठी चळवळ केली. पहिले लोकशाही
अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या किम यांनी बँकेत बेनामी पसे ठेवण्यास प्रतिबंध केला होता.
भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी मोहीमच उघडली. १९९४ मध्ये अमेरिका उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र सुविधांवर
हल्ले करणार होती, पण बिल िक्लटन यांचे मन वळवून किम यांनी हल्ले रोखले. दोन्ही कोरियांची
शिखर बठक ठरली होती, त्या वेळी उत्तर कोरियाच्या अध्यक्षांचे आधीच निधन झाल्याने किम यांची
इतिहास घडवण्याची संधी हुकली. किम यांच्या काळात आशियायी आíथक पेचप्रसंगात
नाणेनिधीकडून ५८ अब्ज डॉलर्स इतकी मदत घेण्याची वेळ देशावर आली होती. काही उद्योग
कर्जबाजारी झाले. चलन समस्येचा इशारा नोकरशाहीने देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण
याच किम यांनी हजारो लोकांचे रोजगार वाचवण्यासाठी जॉिगग बाजूला ठेवून प्रयत्नही केले
होते. त्यांनी जे काही मिळवले ते त्यांच्या मुलास भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाल्याने गमावले