ई-मेलच्या शोधाला यंदा ४५ वर्षे पूर्ण झाली. संदेशवहनात १९७१ मध्ये क्रांती घडवणाऱ्या ई-मेलचे महत्त्व आजही कायम आहे. ही क्रांती घडवणारे रे टॉमलिन्सन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनीकेवळ ई-मेलचा शोध लावला असे नाही तर ई-मेल-पत्त्यातील ‘अ‍ॅट’ हे इंग्रजी चिन्हही त्यांचीच युक्ती. रेथिऑन कंपनीत ते संगणक आज्ञावलीकार (प्रोग्रॅमर) होते. अमेरिकी संरक्षण खात्याच्या ‘अर्पानेट’साठी काम करताना टॉमलिन्सन यांनी ई-मेलचा शोध लावला. साधे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्तेचा अजिबात गर्व नाही, उलट विनयशील स्वभाव हे त्यांचे वैशिष्टय़. टॉमलिन्सन हे न्यूयॉर्कमधील अ‍ॅमस्टरडॅमचे. रेन्सिलर पॉलिटेक्निक व एमआयटी या संस्थेतून शिकल्यानंतर बोल्ट बेर्नेक अ‍ॅण्ड न्यूमन कंपनीत ते रुजू झाले. सुरुवातीपासून ते कंपनीशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या ई-मेलने उद्योग व्यवसायाचे व व्यक्तिगत जगही विस्तारले. १९९८ मध्ये त्यांना फोर्ब्स नियतकालिकाने गौरवले होते.

रे टॉमलिन्सन यांनी ई-मेलचा शोध लावला तेव्हा दोन ई-मेल देणाऱ्या व घेणाऱ्या संगणकांतील अंतर अवघे दहा फूट होते पण आता ते खूप मोठे आहे. त्यांनी हा शोध सहकाऱ्याला दाखवला तेव्हा, आपण यावर काम करीत आहोत हे कुणाला सांगू नकोस असे बजावले होते. आजच्या भाषेत सांगायचे तर त्यांना कुणीच असाइन्मेंट दिलेली नव्हती तरी अर्पानेटशी खेळता-खेळता त्यांना हा शोध लागला. सुरुवातीला जे संदेश येत असत त्यांची पद्धत वेगळी होती, ते निरोप असायचे पण विसरून  जायला व्हायचे. त्यामुळे मी निरोप किंवा संदेशाची एक स्मरण-पद्धत म्हणून ई-मेल शोधला. त्याआधी असे संदेश नोट्सच्या स्वरूपात पाठवले जात, पण ‘सेंड मेसेज प्रोग्रॅम’ यशस्वी झाल्यानंतर सहकाऱ्यांनाही ही पद्धत वापरायला त्यांनी शिकवली, असे ते सांगत असत. पहिला ई-मेल संदेश काय पाठवला हेही रे टॉमलिन्सने नंतर विसरून गेले.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड
adani green, investigation by american agencies
अमेरिकेतील चौकशीशी कसलाही संबंध नसल्याचा ‘अदानी ग्रीन’चा खुलासा; त्रयस्थ कंपनीशी निगडित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा दावा

त्या काळात व्यक्तिगत संगणक फार कमी लोकांकडे होते, त्यामुळे ई-मेलची लोकप्रियता संगणकाच्या वापरासोबत वाढली. २०१२ मध्ये त्यांचा समावेश ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये झाला. ई-मेलमध्ये आता फिशिंग अ‍ॅटॅक, स्पॅम अशा अनेक समस्या असल्या तरी  त्याचे महत्त्व कायम आहे. वापरकर्ता आणि पुरवठादार यांच्यामध्ये अ‍ॅट हे चिन्ह टाकून त्यांनी पत्ता अचूक केला, त्यामुळे ई-मेलला आंतरराष्ट्रीय संदेशवहनात अधिमान्यता लाभली. त्यांना इ.स. २०००मध्ये जॉर्ज स्टीटबिझ संगणक  पुरस्कार, वेबी पुरस्कार, डिस्कव्हर नियतकालिकाचा नवप्रवर्तक शोधाचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान लाभले. रे टॉमलिन्सन यांनी शोधलेल्या  ई-मेलचे इतरांना व्यसनच लागले, पण त्यांनी मात्र स्वत:ला त्यापासून कटाक्षाने दूर ठेवले.