नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि आध्यात्मिक वारशांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्यांमध्ये जी काही नावे आदराने घेतली जातात त्यात वासुदेवराव चोरघडे यांचे नाव प्रमुख आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जात.

चोरघडे यांचा जन्म १२ एप्रिल १९३१ ला झाला. त्यांचे शालेय शिक्षण नरखेड व नंतर वरुडला झाले. कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. टपाल खात्यात नोकरी करीत असताना अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक संस्कृत वाङ्मयाचा आणि दर्शनशास्त्राचा अभ्यास केला. आकाशवाणीसाठी नभोनाटय़ाचे लेखन केले. ५० वर्षांहून अधिक काळ त्यांच्या श्रुतिका, चिंतने आणि व्याख्याने प्रसारित झाली. संतसाहित्य असो किंवा वेदोपनिषद असो, त्यावर बोलताना ते नेहमी समकालीन वास्तवाशी त्याची सांगड घालत. आजच्या काळात प्राचीन तत्त्वज्ञान किती प्रकर्षांने लागू आहे हे ते सांगत. संत ज्ञानदेव, संत एकनाथ, तुकाराम, गुलाबराव महाराज यांच्या साहित्यातील चपखल उदाहरणांनी ते श्रोत्यांना अंतर्मुख करीत. संस्कृत भाषेतील ते एक चालताबोलता ज्ञानकोश होते.

Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
chandrapur lok sabha marathi news
“सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या”, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी.उषा यांचे मत; म्हणाल्या…
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
Discussion by Muralidhar Mohol Ravindra Dhangekar Vasant More at Wadeshwar Katta Pune
पुण्यातील प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे दर्शन; अराजकीय व्यासपीठावर उमेदवारांची शहर हिताची चर्चा

अनेक साहित्यिक शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. विदर्भ साहित्य संघ, विनोबा विचार केंद्र, भागवत सेवा समिती, भोसला वेद पाठशाळा, भारतीय विद्या प्रसारक या संस्थांशी त्यांचा स्नेह होता. त्यांची स्वतंत्र, अनुवादित व संपादित अशी १७ पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील काही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, तर दोन पुस्तकांचा गुजराती आणि कानडी भाषेत अनुवादही झाला आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक समितीचे आमंत्रक म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या एकूणच कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे शास्त्राभ्यास व संस्कृत भाषाभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कार, राज्य शासनातर्फे कवी कुलगुरू संस्कृत साधना पुरस्कार, संत साहित्याच्या प्रचार व प्रसारासाठी मा. ना. घटाटे स्मृती पुरस्कार, वासुदेव नंद सरस्वती वाङ्मय प्रबोधिनी पुरस्कार आदींचा त्यात समावेश आहे. त्यांच्या साहित्यामुळे संस्कृतचे विपुल ज्ञानभंडार मराठीत उपलब्ध झाले. संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ज्ञानसाधू होते. त्यांच्या निधनाने नागपूरच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील आधारवड कोसळला आहे.