News Flash

विधि शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा

कॉमन लॉ अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे राष्ट्रीय स्तरावरील पुढील विधि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो

विधि अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य ठरणाऱ्या महत्त्वाच्या प्रवेशपरीक्षांची माहिती..

दर्जेदार शिक्षणसंस्थांमधून तसेच विद्यापीठांमधून विधि विषयक उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. देशातील नामवंत विधि महाविद्यालयांत चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील विधि महाविद्यालयातील प्रवेशासाठीही राज्य शासनामार्फत एमएएच- सीईटी- लॉ ही परीक्षा घेतली जाणार आहे. विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रवेशपरीक्षांची माहिती या लेखात देत आहोत-

  • एसईटी- लॉ (सिम्बॉयसीस लॉ एन्ट्रन्स टेस्ट) : या संस्थेत बी.ए.- एलएल.बी. आणि बीबीए- एलएल.बी. हे पाच वष्रे कालावधीचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. या परीक्षेद्वारे पुणे, हैदराबाद आणि नॉयडा येथील लॉ स्कूलमध्ये प्रवेश मिळू शकतो.

१५० गुणांच्या पेपरमध्ये कार्यकारणभाव, विधि शिक्षणविषयक कल, विश्लेषणात्मक क्षमता आणि उतारा (वाचनकौशल्य) आणि सामान्य ज्ञान या विषयीचे प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारले जातात. यंदा ही परीक्षा ७ मे २०१६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. संपर्क- सिम्बॉयसीस लॉ स्कूल, २२७, प्लॉट नंबर ११, व्हीआयपी रोड, रोहन मिथिला विमाननगर, पुणे- ४४११०१४. संकेतस्थळ- www.symlaw.ac.in आणि www.set-test.org

ईमेल – admission@symlaw.ac.in

  • कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT)- ही परीक्षा २०० गुणांची आहे. कालावधी- दोन तास. या परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा/ उतारा, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, गणित- संख्यात्मक क्षमता चाचणी, विधि शिक्षणविषयक कल, कार्यकारणभाव यांवर बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षेद्वारे देशातील १७ राष्ट्रीय विधि महाविद्यालयांत शिकवल्या जाणाऱ्या इंटिग्रेटेड पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो : बी.ए.- एलएलबी (ऑनर्स), बी.कॉम.- एलएलबी (ऑनर्स), बीबीए- एलएलबी (ऑनर्स), बीएसडब्ल्यू- एलएलबी (ऑनर्स), बी.एस्सी.- एलएलबी (ऑनर्स). यंदा ही परीक्षा ८ मे २०१६ रोजी होईल.

कॉमन लॉ अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे राष्ट्रीय स्तरावरील पुढील  विधि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी- मुंबई, नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सटिी- बंगळुरू, नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ लीगल स्टडी अ‍ॅण्ड रिसर्च युनिव्हर्सटिी ऑफ लॉ- हैदराबाद, नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सटिी- भोपाळ, द वेस्ट बेंगॉल नॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ ज्युडिशिएल सायन्सेस- कोलकाता, नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी- जोधपूर, हिदायतउल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी- रायपूर, गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी- गांधीनगर, डॉ. राममनाहेर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी- लखनौ, राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ लॉ- पतियाळा, चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी- पाटणा, नॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज- कोची, नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी- ओडिशा- कटक, नॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ स्टडी अ‍ॅण्ड रिसर्च इन लॉ- रांची, नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी अ‍ॅण्ड ज्युडिशिअल अ‍ॅकॅडेमी- गुवाहाटी, दामोदरम संजवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी-विशाखापट्टणम, द तामिळनाडू नॅशनल लॉ स्कूल- तिरुचिरापल्ली.

अर्हता- बारावी परीक्षेमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुण आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण. संकेतस्थळ- clat.ac.in

  • मुंबई युनिव्हर्सटिी कॉमन लॉ एन्ट्रन्स टेस्ट (टव-उछएळ): मुंबई विद्यापीठातील बी.बी.ए.- एलएलबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुंबई युनिव्हर्सटिी कॉमन लॉ एन्ट्रन्स टेस्ट (टव-उछएळ) ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेद्वारे मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे ६० आणि ठाणे उपकेंद्रात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. ही परीक्षा ठाणे आणि फोर्ट कॅम्पस येथे घेतली जाईल. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावीमध्ये ४५ टक्के गुण. संपर्क- युनिव्हर्सटिी नॅशनल लॉ स्कूल, युनिव्हर्सटिी ऑफ मुंबई- रूम नंबर- २०९, दुसरा मजला, फोर्ट कॅम्पस, मुंबई- ४०००३२.

संकेतस्थळ- mu.ac.in/portal/wp-content/ uploads/ sqrv/ qu/ MUCLET.pd

  • एमएएच- सीइटी- लॉ २०१६ : ही परीक्षा राज्याच्या कॉमन एन्ट्रन्स् टेस्ट सेलमार्फत घेतली जाते. या परीक्षेद्वारे राज्यातील शासकीय विधि महाविद्यालयातील तसेच अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित विधि महाविद्यालयातील पाच वष्रे कालावधीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यंदा ही परीक्षा १८ मे २०१६ रोजी घेतली जाणार आहे. संपर्क- स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल, ३०५, तिसरा मजला, शासकीय तंत्रनिकेतन इमारत, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे- पूर्व, मुंबई- ४०००५१.

ईमेल- maharashtra.cetcell@gmail.com

  • यूपीईएस (युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलिअम इंजिनीअिरग स्टडीज) लीगल स्टडीज अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (ULSAT) : या परीक्षेद्वारे बी.ए.- एलएलबी (ऑनर्स) स्पेशलायझेशन इन एनर्जी लॉज, बी.ए.- एलएलबी (ऑनर्स) स्पेशलायझेशन इन क्रिमिनल लॉज/लेबर लॉज, बीबीए- एलएलबी (ऑनर्स) स्पेशलायझेशन इन कॉर्पोरेट लॉज, बीबीए- एलएलबी (ऑनर्स) स्पेशलायझेशन इन इंटरनॅशनल ट्रेड अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट, बीबीए- एलएलबी (ऑनर्स) स्पेशलायझेशन इन बँकिंग, फायनान्स अ‍ॅण्ड इन्श्युरन्स लॉज, बी.कॉम.- एलएलबी (ऑनर्स) स्पेशलायझेशन इन एनर्जी लॉज या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. चाळणी परीक्षा ऑनलाइन असून परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे. या परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा कौशल्य चाचणी, संख्यात्मक कौशल्य, कार्यकारणभाव, विधिविषयक सामान्य ज्ञान आणि विधिविषयक कल यांवर प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची संख्या- १५०. यंदा ही परीक्षा १४ मे २०१६ रोजी घेतली जाणार आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. संपर्क- एनर्जी एकर्स, पोस्ट ऑफिस बिधोली व्हाया प्रेमनगर, देहराडून- २४८००७. संकेतस्थळ- ac.in

ईमेल -enrollments@upes.ac.in

  • बीएचयू- एलएलबी एन्ट्रन्स टेस्ट (BHU UET LAW): अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. बी.ए.- एलएलबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी परीक्षा यंदा १५ मे २०१६ रोजी होणार आहे. दोन तासांच्या या परीक्षेत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, विधिविषयक कलचाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी व इंग्रजी उताऱ्यावरील प्रश्न विचारले जातात. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या- १५०. गुण- ४५०. संपर्क- बनारस िहदू विद्यापीठ लॉ स्कूल, वाराणसी- २२१००५.

संकेतस्थळ- www.bhu.ac.in

ईमेल- dean.lawschool.bhu@gmail.com

  • ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट : नॅशनल लॉ युनिव्हर्सटिी दिल्ली या संस्थेच्या बी.ए.- एलएलबी (ऑनर्स), एलएलएम आाणि पीएच.डी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांसह मुंबई येथेही घेतली जाईल.

संकेतस्थळ- nludelhi.ac.in ईमेल- info@nludelhi.ac.in

  • गुरू घसिदास विश्वविद्यालय एन्ट्रन्स टेस्ट (श्कळ) : गुरू घसिदास विश्वविद्यालय या केंद्रीय विद्यापीठात बी.ए.- एलएलबी आणि बी.कॉम.- एलएलबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विश्वविद्यालय एन्ट्रन्स टेस्ट (श्कळ) घेण्यात येते.

अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. संपर्क-गुरू घसिदास विश्वविद्यालय, कोनी बिलासपूर- ४९५००९.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2016 5:02 am

Web Title: law education entrance
Next Stories
1 ‘इव्हेन्ट मॅनेजमेन्ट’मधील करिअर संधी
2 इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम
3 क्रीडा प्रशिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी..
Just Now!
X