सागरी जैवशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि करिअर संधींची ओळख..
सागरी जैवशास्त्राअंतर्गत समुद्री पर्यावरणात अंतर्भूत होणाऱ्या प्रत्येक घटकाचा अभ्यास केला जातो. त्यात समुद्री जलचरांचा आणि वनस्पतींचाही समावेश होतो. समुद्री परिसंस्था, समुद्री सस्तन प्राणी, अ‍ॅक्वाकल्चर, समुद्राचे रासायनिक आणि पदार्थविज्ञानविषयक गुण आणि पाणथळ जागा आदी स्पेशलायझेशनची क्षेत्रे आहेत. जलपर्यावरणावर मानवी व्यवहारांचे होणारे परिणाम, सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या विषयाचा अभ्यास केला जातो.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवाराने किमान जीवशास्त्रात किंवा मरिन सायन्समध्ये एम.एस्सी अथवा पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. मात्र, बारावीमध्ये विज्ञानशाखेत जीवशास्त्र विषय असणे आणि जीवशास्त्रातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत ओशनोग्राफी, फिशरीज टेक्नॉलॉजी, सागरी जैवशास्त्र, सागरी प्राणिशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन तसेच पीएच.डी करता येते. यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी, अ‍ॅक्वाकल्चर जेनेटिक्स, मरिन फिजिओलॉजी, मरिन मॅमोलॉजी, मरिन पोल्युशन, मरिन इकोसिस्टीम्स,
कोरल रीफ इकोलॉजी, केमिकल इकोलॉजी या विषयांचा समावेश आहे.
करिअर संधी : सागरी जीवसृष्टीविषयी आस्था असणाऱ्या उमेदवारांना या ज्ञानशाखेचा अभ्यास करणे आनंददायी ठरू शकते. या ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ सागरकिनारे आणि प्रत्यक्ष सागरावर व्यतीत करावा लागतो. सागराच्या अंतर्गत भागात जाऊन संशोधन करावे लागते. सागरी जैवशास्त्रज्ञांना शासकीय संस्था, संशोधन प्रयोगशाळा, मत्स्यालये, अध्यापन, सागरी पर्यावरणशास्त्रज्ञ अशा विविध करिअर संधी मिळू शकतात. ओशनोग्राफी केंद्रे, संशोधन बोटी आणि पाणबुडय़ा येथे काम करता येते. सागरी पर्यावरण, प्रदूषण आणि जैवविविधता कार्यक्षेत्रात कार्यरत असणारी मंडळे, स्वयंसेवी संस्था, औषधनिर्मिती कंपन्या यांच्यासोबत संशोधन प्रकल्प राबवता येतात.

अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या काही संस्था :
कोचीन युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी:
* डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी अ‍ॅण्ड बायोकेमिस्ट्री- एम.एस्सी इन मरिन बायोलॉजी. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांसह बी.एस्सी. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
* डिपार्टमेंट मरिन जिऑलॉजी आणि जिओफिजिक्स- एम.एस्सी टेक इन मरिन जिऑलॉजी. कालावधी- दोन वष्रे. याच विषयात पीएच.डी करता येते. हा अभ्यासक्रम सागरी धातू/ खनिजांचा शोध, हायड्रोकार्बनचा अभ्यास, अंटाकर्टका संशोधन या विषयांवर भर दिला जातो.
* डिपार्टमेंट ऑफ फिजिकल ओशनोग्राफी- १. एम.एस्सी. इन फिजिकल ओशनोग्राफी (अर्हता- ५५ टक्के गुणांसह भौतिकशास्त्र आणि गणित या विषयासह पदवी.) २. पीएच.डी. अभ्यासक्रमात कोस्टल झोन मॅनजमेंट, रिव्हर इनपुट्स इन ओशन सिस्टीम, अकॉस्टिक ओशनोग्राफी या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते.
* डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी अ‍ॅण्ड बायोकेमिस्ट्री : एम.एस्सी. इन मरिन बायोलॉजी आणि पीएच.डी या विभागाने हायड्रोग्राफी, इश्चुराइन फ्लोरा, बॉटम फ्लोरा, प्रॉन फिशरी रिसोस्रेस, फिशरी बायोलॉजी, मरिन पोल्युशन, फिजिऑलॉजी ऑफ मरिन अ‍ॅनिमल्स, प्रॉडक्टिव्हिटी ऑफ इन्शोर वॉटर्स मरिन मायक्रोबायोलॉजी अ‍ॅण्ड बायोकेमिस्ट्री आदी विषयांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे.
* डिपार्टमेंट ऑफ केमिकल ओशनोग्राफी- एम.एस्सी. (हायड्रोकेमिस्ट्री)आणि एम.फिल (केमिकल ओशनोग्राफी). सागरी जलपर्यावरण, जलप्रदूषण संनियंत्रण, प्रदूषणाचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम, सागरी संसाधनाचे व्यवस्थापन, किनारा प्रदेश व्यवस्थापन या विषयांवरही लक्ष केंद्रित केले जाते.
संपर्क- थिकक्कारा, साऊथ कलामेस्सेरी, कोची,
केरळ- ६८२०२२. संकेतस्थळ- http://www.vnsgu.ac.in

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

वीर नर्मद दक्षिण गुजराथ विद्यापीठ :
या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅक्वॉटिक बायोलॉजीमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
* एम.एस्सी इन अ‍ॅक्वॉटिक बायोलॉजी : अर्हता- जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मत्स्यशास्त्र, औद्योगिक मत्स्यशास्त्र, सागरी विज्ञान, पर्यावरणशास्त्र, जैवतंत्रज्ञानशास्त्र यांपकी कोणत्याही एका विषयासह पदवी. ल्लएम.फिल इन अ‍ॅक्वॉटिक बायोलॉजी : अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
* पीएच.डी इन अ‍ॅक्वॉटिक बायोलॉजी : अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. संपर्क- रजिस्ट्रार, वीर नर्मद दक्षिण गुजराथ विद्यापीठ, सुरत- ३८५००७.
संकेतस्थळ- http://www.cusat.ac.in

कर्नाटक युनिव्हर्सटिी, डिपार्टमेंट ऑफ मरिन बायोलॉजी: संस्थेचे अभ्यासक्रम- एम.एस्सी इन मरिन बायोलॉजी आणि एम.फिल इन मरिन बायोलॉजी. संपर्क- कर्नाटक युनिव्हर्सटिी, पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर कोडिबाग,
कारवार- ५८१३०३ कर्नाटक.

कोलकाता युनिव्हर्सटिी, डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्स : एम.एस्सी इन मरिन सायन्स, अर्हता- बी.एस्सी आणि पीएच.डी इन मरिन सायन्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संपर्क- ३५, बॅलीगुंगे सक्र्युलर रोड, कोलकाता- ७०००१९.
संकेतस्थळ- http://www.vnsgu.ac.in

आंध्र युनिव्हर्सटिी, डिपार्टमेंट ऑफ मरिन लिव्हिग रिसोस्रेस: संस्थेचे अभ्यासक्रम- एम.एस्सी इन मरिन बायोटेक्नॉलॉजी ल्लएम.एस्सी इन मरिन बायोलॉजी अ‍ॅण्ड फिशरीज. एम.एस्सी इन कोस्टल अ‍ॅक्वाकल्चर अ‍ॅण्ड मरिन बायोटेक्नॉलॉजी. संपर्क- डिपार्टमेंट ऑफ मरिन लिव्हिग रिसोस्रेस, कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, आंध्र युनिव्हर्सटिी, विशाखापट्टणम- ५३०००३.
संकेतस्थळ- http://www.caluniv.ac.in

गोवा विद्यापीठ : अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी- एम.एस्सी इन मरिन मायक्रोबायोलॉजी.
* डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी- एम.एस्सी इन मरिन बायोटेक्नॉलॉजी.
* डिपार्टमेंट ऑफ मरिन सायन्स- एम.एस्सी इन मरिन सायन्स. कालावधी- प्रत्येकी दोन वष्रे. संपर्क- गोवा विद्यापीठ,
गोवा- ४०३२०६. संकेतस्थळ- andhrauniversity.edu.in

केरळ युनिव्हर्सटिी ऑफ फिशरीज अ‍ॅण्ड ओशन सायन्स: अभ्यासक्रम- मास्टर ऑफ फिशरी सायन्स इन अ‍ॅक्वाकल्चर, फिश बायोटेक्नॉलॉजी, अ‍ॅक्वॉटिक अ‍ॅनिमल हेल्थ मॅनेजमेंट, अ‍ॅक्वॉटिक अ‍ॅनिमल एन्व्हायरॉन्मेट मॅनेजमेंट, फिश जेनेटिक्स अ‍ॅण्ड ब्रीडिंग फिश न्युट्रिशन अ‍ॅण्ड फीड टेक्नॉलॉजी, फिशरीज इकॉनॉमिक्स, फिशरीज रिसोर्स मॅनेजमेंट. संपर्क- केरळ युनिव्हर्सटिी ऑफ फिशरीज अ‍ॅण्ड ओशन सायन्स, पानागड, कोची- ६८२५०६. संकेतस्थळ- http://www.unigoa.ac.in

नॅशनल सेंटर फॉर अंटाíक्टक अ‍ॅण्ड ओशन रिसर्च या संस्थेमार्फत अंटाíक्टका येथे संशोधन इंटर्नशीप करण्याची संधी इच्छुक विद्यार्थ्यांना दिली जाते. हा कालावधी दरवर्षी मे ते जून असा असतो. यासाठी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधता येतो. संपर्क- डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर अंटाíक्टक अ‍ॅण्ड रिसर्च ओशन, वास्को, गोवा- ४०३८०२.
संकेतस्थळ- http://www.ncaor.gov.in