जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी यांसारख्या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
चित्रपट, रेडिओ, दूरचित्रवाणी, जाहिरात या क्षेत्रांत करिअर करण्यासाठी दीर्घ मुदतीचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम निश्चितच उपयुक्त ठरतात. मात्र, हे दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम करणे ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही आणि ज्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची आवड, इच्छा आणि कल आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काही संस्थांनी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम प्रमाणपत्र अथवा पदविका स्तरावरील असतात.
या अभ्यासक्रमांद्वारे प्रामुख्याने छंद स्वरूपात जोपासल्या गेलेल्या विषयांचे प्रशिक्षण मिळू शकते. या प्रशिक्षणानंतर जे कौशल्य प्राप्त होते त्याचा प्रभावी व सर्जनशील वापर करता आला तर करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात. हे क्षेत्र अतिशय स्पर्धात्मक असल्याने परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. स्वत:ला सतत अपडेट ठेवावे लागते. हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांची तसेच काही अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत-

स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन :
* सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग.
* स्क्रिप्ट रायटिंग अ‍ॅण्ड डायरेक्शन फॉर फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन.
संपर्क- स्कूल ऑफ ब्रॉडकॉस्टिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, अंधाक्षी बिल्डिंग ३७, अंधेरी रिक्रिएशन क्लबच्या पाठीमागे, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८.
संकेतस्थळ- http://www.sbc.ac.in ईमेल- info@ sbc.ac.in
एएएफटी स्कूल ऑफ सिनेमा :
संस्थेने ३ महिने कालावधीचे पुढील अभ्यासक्रम सुरू
केले आहेत- ल्लप्रॉडक्शन डायरेक्शन अ‍ॅण्ड टीव्ही जर्नालिझम ल्लव्हिडीओ एडिटिंग अ‍ॅण्ड साऊंड रेकॉìडग, कॅमेरा अ‍ॅण्ड लायटिंग टेक्निक्स ल्लस्क्रीनप्ले रायटिंग ल्लसाऊंड रेकॉìडग अ‍ॅण्ड रेडिओ प्रॉडक्शन.
संपर्क- मारवाह स्टुडिओ कॉम्प्लेक्स, एफसी- १४/१५, फिल्म सिटी, सेक्टर- १६ ए, नॉयडा, उत्तर प्रदेश.
संकेतस्थळ- http://www.aaft.com ईमेल- help@aaft.com

Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
panvel municipal corporation
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार
loksatta analysis ai based system to reduce human wildlife conflict in tadoba andhari tiger reserve
विश्लेषण : ताडोबातील वन्यजीवमानव संघर्षात ‘एआय’ नेमके काय करणार?
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म अ‍ॅण्ड मीडिया :
* इंट्रोडक्शन टू फिल्म डायरेक्शन. कालावधी- १० आठवडे.
* अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन थ्री डी अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड व्हीएफएक्स. कालावधी- एक वर्ष.
संपर्क- अन्नपूर्णा स्टुडिओ, रोड टू, बंजारा हिल्स,
हैदराबाद- ३४. संकेतस्थळ- http://www.aisfm.edu.in
ईमेल- info@ aisfm.edu.in

देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज :
* सर्टिफिकेट कोर्स इन साऊंड इंजिनीअिरग. कालावधी- ९ महिने. ल्लसर्टिफिकेट कोर्स डिजिटल फिल्म मेकिंग. कालावधी- ११ महिने.
संपर्क- आरएसईटी कॅम्पस, एस.व्ही रोड, मालाड (प.), मुंबई- ४०००६४. संकेतस्थळ- http://www.dgmcms.org.in
ईमेल- info@dgmcms.org.in

झी इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया आर्ट्स :
संस्थेचे अभ्यासक्रम- फिल्म अ‍ॅण्ड टीव्ही प्रॉडक्शन. कालावधी- सहा महिने. या अभ्यासक्रमामध्ये चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक अशा निर्मिती, वितरण, प्रदर्शन, कायदेशीर बाजू, विविध परवानग्या, वित्त आणि अर्थनियोजन, विक्री, प्रसिद्धी आदी बाबींची माहिती देण्यात येते.
संपर्क- ३, आशिकी बंगला, शास्त्रीनगर, पहिली गल्ली, एचडीएफसी बँकेच्या विरुद्ध दिशेला, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३.
संकेतस्थळ- http://www.zimainstitute.com/cinematography

सेंट पॉल्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन एज्युकेशन :
संस्थेचे अभ्यासक्रम- ल्लसर्टिफिकेट कोर्स इन अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड कॉपी रायटिंग. कालावधी- तीन महिने.
* सर्टिफिकेट कोर्स इन व्हीडिओग्राफी. कालावधी- तीन महिने.
* सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेन्ट्स. कालावधी- तीन महिने.
* अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन पब्लिक रिलेशन अ‍ॅण्ड कॉर्पोरेट कम्युनिकेशन. कालावधी- सहा महिने.
* अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन अ‍ॅडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट. कालावधी- सहा महिने. हे अभ्यासक्रम टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स स्कूल ऑफ व्होकेशनल स्टडीजच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहेत.
* डिप्लोमा इन स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग- या संस्थेने एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग हा अंशकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. क्रीडा प्रसारणासाठी आवश्यक असणारी तंत्रकौशल्ये या अभ्यासक्रमात शिकवली जातात. क्रीडासंदर्भातील लिखाण आणि सादरीकरण, व्हीडिओ निर्मिती तंत्र, प्रसारण, क्रीडाविषयक उपक्रमांची आखणी व नियोजन आदी बाबींचाही या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. संपर्क- २४ रस्ता, टीपीएस ३, वांद्रे (पश्चिम),
मुंबई- ४०००५०. संकेतस्थळ- http://www.stpaulscice.com
ईमेल- info@stpaulscice.com

व्हिसिलग वूड इंटरनॅशनल :
या संस्थेने टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन या संस्थेच्या सहकार्याने चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात नोकरी तसेच स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतील असे व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कालावधी- ३ महिने. अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- ल्लसर्टिफिकेट इन व्हीडिओग्राफी.
* सर्टिफिकेट इन स्टील फोटोग्राफी.
* सर्टिफिकेट इन रोटो पेंट (व्हिज्युअल इफेक्ट्स).
* सर्टिफिकेट इन साऊंड रेकॉìडग.
* सर्टिफिकेट इन इंट्रोडक्शन टू ऑडिओ- व्हिज्युअल्स. कालावधी- सहा महिने.
* अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट इन एडिटिंग सॉफ्टवेअर ऑपरेशन.
* अ‍ॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट इन स्टुडिओ साऊंड रेकॉडिंग.
* सर्टिफिकेट इन टू डी कॅरेक्टर डिझाइन. कालावधी- १० आठवडे. अर्हता- ललित कलामधील पदवी.
* सर्टिफिकेट इन अ‍ॅडव्हर्टायजिंग रायटिंग. कालावधी- १० आठवडे. अर्हता- इंग्रजीचे ज्ञान.
* सर्टिफिकेट इन मेकअप अ‍ॅण्ड हेअर. कालावधी- १० आठवडे. अर्हता- दहावी-बारावी. संपर्क- व्हिसिलग वूड इंटरनॅशनल, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व),
मुंबई- ४०००६५. संकेतस्थळ- http://www.whistlingwoods.net
ईमेल- admissions@ whistlingwoods.net

रिलायन्स अ‍ॅनिमेशन :
या संस्थेत फंडामेंटल्स ऑफ फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम करता येतो. डिजिटल चित्रपटनिर्मितीचे प्रारंभीचे मूलभूत प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. अर्हता- दहावी/बारावी. कालावधी- दोन महिने. संपर्क- ३०१, बी विंग, बिझनेस पॉइंट, पालीराम रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८. संकेतस्थळ- http://www.relianceaims.com

डिप्लोमा इन रेडिओलॉजिक फिजिक्स
मुंबईच्या भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरने डिप्लोमा इन रेडिओलॉजिक फिजिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- एम.एस्सी. भौतिकशास्त्र. विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
हा अभ्यासक्रम होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटच्या अंतर्गत चालवला जातो.
संकेतस्थळ- http://www.barc.gov.in आणि http://www.hbni.ac.in