क्रीडा प्रशिक्षण क्षेत्राकडे वळणाऱ्यांसाठी नेताजी सुभाष राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेच्या विविध कॅम्पसमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची इत्थंभूत माहिती..

नेताजी सुभाष राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था ही संस्था आपल्या देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणारी, जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणारी आणि अत्याधुनिक क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारी शिखर संस्था आहे.

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
journalism fellowships scholarships in journalism fellowship for the future of journalism
स्कॉलरशीप फेलोशिप : पत्रकारांसाठी फेलोशिप
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप

या संस्थेला आशिया खंडातील क्रीडाविषयक शिक्षण-प्रशिक्षण-संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारी आघाडीची संस्था हा मान प्राप्त झाला आहे. १९७३ सालापासून कार्यरत असलेल्या या संस्थेचे प्रमुख केंद्र पतियाळा येथे आहे.

या संस्थेने डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या एका वर्षांत १० महिने प्रत्यक्ष अभ्यासक्रम आणि दोन महिने अत्यावश्यक अशा इंटर्नशिपचा समावेश आहे.

हा अभ्यासक्रम दरवर्षी साधारणत: जुल महिन्यात सुरू होतो. संस्थेच्या पतियाळा, बंगळुरू, कोलकाता आणि थिरुवनंतपुरम येथील कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

अभ्यासक्रम :

  • पतियाळा कॅम्पस : डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग इन-अ‍ॅथेलिटिक्स/ बास्केटबॉल/ बॉिक्सग/ क्रिकेट/ सायकिलग/ फेिन्सग/ फुटबॉल/ जिमनॅस्टिक्स/ हँडबॉल/ हॉकी/ ज्युडो/ टेबल टेनिस/ स्वििमग/ व्हॉलिबॉल/ वेटलििफ्टग/ रेसिलग/ वुशू.
  • बंगळुरू कॅम्पस : डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग इन- अ‍ॅथेलिटिक्स/ बॅडिमटन/ हॉकी/ कबड्डी/ खो-खो/ सॉफ्टबॉल/ स्वििमग/ तायक्वान्दो/ टेनिस/ व्हॉलिबॉल.
  • कोलकाता कॅम्पस : डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग इन- आर्चरी/ अ‍ॅथेलिटिक्स/ बॉिक्सग/ क्रिकेट/ व्हॉलिबॉल.
  • थिरुवंतपुरम कॅम्पस : डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग इन- रोिवग/ कयाकिंग अ‍ॅण्ड कनोईंग/ फुटबॉल/ कंडिशिनग अ‍ॅण्ड रिकव्हरी.

अर्हता- पुढील शैक्षणिकदृष्टय़ा अर्हताप्राप्त उमेदवारांची निवड या अभ्यासक्रमांसाठी होऊ शकते- प्रवर्ग (अ- एक) : कोणत्याही विषयातील पदवीधर, मान्यताप्राप्त क्रीडा स्पध्रेत जागतिक स्तरावर सहभाग किंवा मान्यताप्राप्त राष्ट्रीय वरिष्ठ श्रेणीच्या क्रीडा स्पध्रेत सहभाग किंवा दोन वेळ ऑल इंडिया युनिव्हर्सटिी/ मान्यताप्राप्त ज्युनिअर/ युथ नॅशनल चॅम्पियनशिप/ इंटर सíव्हस मीट/ ऑल इंडिया पोलीस मीट/ इंटर रेल्वे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभाग.

प्रवर्ग (अ दोन) : चार वष्रे कालावधीची फिजिकल एज्युकेशन या विषयातील पदवी/ फिजिकल एज्युकेशन याच विषयातील पदव्युत्तर पदविका आणि ऑल इंडिया युनिव्हर्सटिी चॅम्पियनशिप, नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोनदा सहभाग  किंवा फिजिकल एज्युकेशन या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सटिी चॅम्पियनशिप/ सीनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये एकदा सहभाग.

प्रवर्ग (ब) (आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी) : कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण आणि ऑलिम्पिक स्पर्धा/ सीनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप/ कॉमनवेल्थ गेम्स/ एशियन गेम्स/ सीनिअर एशियन चॅम्पियनशिपमध्ये सहभाग.

वयोमर्यादा- १ जुल रोजी २० ते २५ वष्रे. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा जागतिक स्पर्धा यांमध्ये सहभागी खेळाडू आणि अनुसूचित जाती/जमाती आणि इतर संवर्गातील खेळाडूंसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत.

प्रवेश प्रक्रिया : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर चाळणी परीक्षा घेतली जाते. या चाळणी परीक्षेमध्ये लेखी परीक्षा, सराव परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय तंदुरुस्ती परीक्षेचा समावेश आहे.

लेखी परीक्षेमध्ये ज्या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यावरील प्रश्न आणि सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. सराव परीक्षेमध्ये उमेदवाराला ज्या क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यातील प्रभुत्वाची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाते. मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्त्व, सादरीकरणाचे कौशल्य आणि विषयाचे ज्ञान यांवर भर दिला जातो. वैद्यकीय चाचणीत तंदुरुस्त असल्याचे आढळून आल्यास प्रवेशावर शिक्कामोर्तब केले जाते.

शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आणि िहदी आहे. शिकवण्याच्या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी, संभाषण, चर्चासत्रे, निबंध वाचन, प्रकल्प, चित्र आणि व्हिडीओ फितीचे विश्लेषण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स आणि प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. अभ्यासक्रमात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन, स्पर्धाचे आयोजन व नियोजन कसे करावे याचाही समावेश आहे.

माहिती-तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व उमेदवारांना या क्षेत्रातील अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचा अत्याधुनिक दृक्श्राव्य विभाग असून त्याद्वारे उमेदवारांना चित्रफिती तसेच इतर साधनांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. संगणक कक्षाद्वारे सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. संस्थेचे विविध क्रीडा प्रकार आणि क्रीडा विज्ञान क्षेत्राशी संबंधित २० हजार ग्रंथ असलेले आधुनिक वाचनालय असून देश-विदेशातील क्रीडाविषयक शेकडो नियतकालिकेसुद्धा उमेदवारांना उपलब्ध करून दिली जातात.

या संस्थेने प्लेसमेंट पोर्टलची निर्मिती केली असून त्याद्वारे उमेदवारांना विविध प्रकारच्या क्रीडा प्रशिक्षणाच्या आणि क्रीडा विज्ञान क्षेत्रातील संधींची ओळख करून दिली जाते. या संस्थेमध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये आरोग्याची

काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ५२ हजार रुपये आहे.

संपर्क : उमेदवारांना ज्या कॅम्पसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्याच केंद्रावर अर्ज करावा लागतो.

  • पतियाळा कॅम्पस- एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (अ‍ॅकॅडेमिक्स), स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स, ओल्ड मोती बाग,पतियाळा- १४७००१. ई-मेल- nnetajisubhas@yahoo.com
  • कोलकाता कॅम्पस-अ‍ॅकॅडेमिक हब सेंटर, डेप्युटी डायरेक्टर इनचार्ज, स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, नेताजी सुभाष इस्टर्न सेंटर सेक्टर- थ्री, कोलकाता- ७०००९८.

ई-मेल- saieccal@rediffmail.com

  • बंगळुरू कॅम्पस- अ‍ॅकॅडेमिक हब सेंटर, बंगळुरू

डेप्युटी डायरेक्टर, स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, नेताजी सुभाष सदर्न सेंटर, जननभारती कॅम्पस- म्हैसूर रोड, बंगळुरू- ५६००५६.

ई-मेल- sainssc.blore@gmail.com

रिचर्ड मेटझलर स्कॉलरशीप

परदेशातील नामांकित व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना रिचर्ड मेटझलर  शिष्यवृत्ती मिळू शकते.

अर्हता- पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलेले उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीची रक्कम ५ हजार डॉलर्स.

संकेतस्थळ- www.amcf.org ई-मेल-  info@amcf.org