सांख्यिकी विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख..
द इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेत पुढील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम केल्यानंतर करिअरच्या उत्कृष्ट संधी मिळू शकतात.

मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स (एम.स्टॅट) – दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन वर्षांचा आहे. एम.स्टॅट हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उमेदवारांनी निवडलेल्या त्यांच्या स्पेशलायझेनशच्या विषयानुसार सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, संगणकशास्त्र अशा तत्सम क्षेत्रांत संशोधनाची-अध्यापनाची संधी मिळू शकते तसेच संशोधन संस्था आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे विशेषज्ञ, सांख्यिकी तज्ज्ञ म्हणून करिअर करता येते. या वर्षी हा अभ्यासक्रम कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई येथे करता येईल.
अर्हता – या संस्थेची बी.स्टॅट पदवी किंवा स्टॅटिस्टिक्स या विषयासह बीई किंवा बीटेक किंवा या संस्थेची बी.मॅथ्स पदवी, किंवा संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिकल मेथड्स वुईथ अ‍ॅप्लिकेशन/ स्टॅटिस्टिकल मेथड्स अ‍ॅड अनॅलिटिक्स.
प्रवेश प्रक्रिया- या संस्थेतून बी.स्टॅट ही पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना थेट प्रवेश देण्यात येतो. इतर उमेदवारांच्या प्रवेशासाठी लेखी चाळणी परीक्षा व मुलाखत घेतली जाते.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश

मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स (एम.मॅथ्स)- या अभ्यासक्रमात प्रगत स्तरावरील गणिताचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्याक्रम आलटून पालटून चेन्नई किंवा बेंगळुरु या कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या वर्षी हा अभ्यासक्रम कोलकाता येथे करता येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित उमेदवारांना गणित विषयात संशोधन आणि अध्यापनाच्या क्षेत्रात करिअर करता येते.
अर्हता – या संस्थेची बी.मॅथ्स किंवा बी.स्टॅट ही पदवी किंवा गणित या विषयासह बी.ई./ बीटेक. या संस्थेची बी.स्टॅट ही पदवी प्राप्त उमेदवारांना थेट प्रवेश दिला जातो. इतर सर्व उमेदवारांना लेखी चाळणी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागते. प्रवेशासाठी आतापर्यंतची शैक्षणिक कामगिरीही लक्षात घेतली जाते.
मास्टर ऑफ सायन्स इन क्वान्टिटेटिव्ह इकॉनॉमिक्स (एम.एस-क्यूई)- दोन वष्रे कालावधीचा हा अभ्यासक्रम अर्थशास्त्र आणि त्याचे उपयोजन यांतील प्रगत स्तरावरील अभ्यासकम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित उमेदवार अर्थतज्ज्ञ म्हणून करिअर करू शकतो. मोठय़ा औद्योगिक कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय जबाबदारीच्या पदांवर नियुक्ती मिळू शकते. हा अभ्यासक्रम अनुक्रमे कोलकाता आणि दिल्ली येथे करता येतो.
अर्हता – या संस्थेची बी.स्टॅट किंवा बी.मॅथ्स पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित/ अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ भौतिकशास्त्र या विषयातील पदवी. निवड- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाते. ही परीक्षा बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. त्यात पदवी स्तरावरील अर्थशास्त्र आणि गणिताचे प्रश्न विचारले जातात.

मास्टर ऑफ सायन्स इन क्वालिटी मॅनेजमेंट सायन्स (एम.एस-क्यूएमएस)- गुणवत्ता व्यवस्थापन, गुणवत्ता विश्लेषक यांसारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा दोन वष्रे कालावधीचा हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमाचे पहिली दोन सत्रे- बेंगळुरु, तिसरे सत्र- हैदराबाद आणि प्रकल्प कार्याचे चौथे सत्र हे प्रत्यक्ष कामकाजाच्या ठिकाणी करावे लागते. अर्हता- कोणत्याही विषयातील गणित या विषयासह पदवी किंवा बी.ई/ बी.टेक. निवड- या अभ्यासक्रमासाठी निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते. ही परीक्षा बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. त्यात पदवी स्तरावरील गणिताचे प्रश्न विचारले जातात.
मास्टर ऑफ सायन्स इन क्वालिटी मॅनेजमेंट सायन्स- अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील उमेदवारास हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पसमध्ये शिकता येतो. ग्रंथालये आणि माहिती शास्त्र या विषयांतील उच्च श्रेणीच्या मनुष्यबळ निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो.

एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स- हा अभ्यासक्रम दोन वष्रे कालावधीचा आहे. तो कोलकाता कॅम्पसमध्ये करता येतो. अर्हता- गणित/ सांख्यिकी/ भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन/ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई किंवा बीटेक. निवड- या अभ्यासक्रमासाठी निवड ही लेखी परीक्षेद्वारे केली जाते. ही परीक्षा बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. पहिल्या भागात पदवी स्तरावरील गणिताचे प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या भागात भौतिकशास्त्र, सांख्यिकी आणि गणित या विषयांवरील पदव्युत्तर पदवी स्तराचे आणि संगणक शास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयातील पदवीस्तरीय प्रश्न विचारले जातात. या पाच उपविभागांतून कोणत्याही एका उपभागाचे प्रश्न उमेदवार सोडवू शकतात.
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन क्वालिटी, रिलिअ‍ॅबिलिटी अ‍ॅण्ड ऑपरेशन्स रिसर्च- या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वष्रे. हा अभ्यासक्रम कोलकाता कॅम्पसमध्ये करता येतो.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स- हा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, खरगपूर या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. उच्चस्तरीय व्यावसायिक विश्लेषणाशी संबंधित हा आधुनिक अभ्यासक्रम आहे. तो बहुविद्याशाखीय अशा दोन वर्षांचा पूर्णकालीन असा अभ्यासक्रम आहे. देश-विदेशातील मोठय़ा कंपन्या, औद्योगिक क्षेत्र, कॉर्पोरेट हाऊसेस यांना या क्षेत्रांतील उच्चप्रशिक्षित तज्ज्ञांची सध्या गरज भासत आहे.
अर्हता – विज्ञान किंवा तंत्रज्ञान किंवा अभियांत्रिकी विषयातील पदवी परीक्षेत ६० टक्के गुण आवश्यक. किंवा इंटिग्रेटेड पदवी स्तरावर ६० टक्के गुण. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमधून ५ टक्के सवलत उपलब्ध आहे.
निवड – उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. अंतिम निवडीच्या वेळी कार्यानुभव आणि शैक्षणिक गुणवत्ताही ध्यानात घेतली जाते.
या संस्थेमार्फत वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप दिली जाते तसेच या संस्थेत पीएच.डी करण्याची संधीही उपलब्ध आहे.
परीक्षेची केंद्रे – या अभ्यासक्रमांसाठी देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाते.
यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या केंद्रांचा समावेश आहे.
ही परीक्षा ८ मे २०१६ रोजी घेतली जाणार आहे.
संपर्क- इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, २०३, बॅरॅकपोर, ट्रंक रोड, कोलकाता- ७००१०८.
संकेतस्थळ- http://www.isical.ac.in

शिष्यवृत्ती
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे शिष्यवृत्ती आणि इतर आर्थिक सहाय्य केले जाते.
बी मॅथ आणि बी.स्टॅट- दरमहा ३ हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी ३ हजार रुपये.
एम.मॅथ्स आणि एम.स्टॅट- दरमहा ५ हजार रुपये आणि दर वर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार रुपये.
एम.टेक- दरमहा ८ हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार रुपये.
ज्यूनिअर रिसर्च फेलोशिप- दरमहा २५ हजार ते २८ हजार रुपये आणि नियमानुसार घरभाडे आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी २८ हजार रुपये.
सीनिअर रिसर्च फेलोशिप- दरमहा २८ हजार ते ३२ हजार रुपये आणि नियमानुसार घरभाडे आणि दर वर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी २८ हजार रुपये.