प्रत्येक सीझनमध्ये ट्रेंड्स, स्टाइल्स बदलल्या की आपले पाय वळतात त्या फॅशनेबल शॉपिंसाठी. पण त्या फॅशनमधला युनिकनेस जपण्याची आपली हौस कशी भागवायची? आपल्या वॉर्डरोबला आपणच एक स्पेशल डिझायनर टच दिला तर? थोडंसं मेहनतीचं आणि भटकंती करायला लावणारं आहे हे काम, पण त्यात गंमतही तितकीच आहे.

ड्रेस निवडताना तुम्ही त्यात काय काय पाहता? पहिल्यांदा अर्थातच त्याचा रंग, मग नेकलाइन, बटन्स, स्लीव्ह आणि बरंच काही.. पण कधी तुम्ही एखादा ड्रेस फक्त त्याची हेमलाईन बघून निवडला आहे? नाही ना.. किंवा असेल तरी अगदीच क्वचितच ना? खरं तर कोणत्याही ड्रेसला ‘फिनिशिंग टच’ देणारी हेमलाईन सर्वात महत्त्वाची असते. कापडाला त्याचा योग्य फॉल योग्य हेमलाईनमुळेच मिळतो. ड्रेस धुतल्यावर त्याचं विसंगत आखूड होणं हेमलाईन नीट शिवली असेल तर टाळता येतं आणि इतकं असूनही हेमलाईनचे फारसे नखरे नसतात. तिला पायपिंग लावा, लेस, बॉर्डर, लटकनने सजवा. अनइव्हन, बॉक्स, वर्तुळाकार कोणताही कट द्या. शिवा किंवा नुसतीच मोकळी सोडा. तिचं रूप खुलत जाणारच आणि तुमच्या ड्रेसला खास टच मिळत राहणार. एखादा निष्णात टेलर असेल तर तो या हेमलाईनला आपला स्पेशल टच दिल्याशिवाय कोणताच ड्रेस बाजूला ठेवत नाही. त्यामुळे टेलरचं कौशल्य ओळखायचं असेल तर पहिल्यांदा त्याने शिवलेल्या ड्रेसची हेमलाईन पहावी. जर ती योग्य असेल तर काम फत्ते.
तुमच्या ड्रेसला हेमलाईन कशी असावी हे त्या ड्रेसच्या कापडावर ठरतं. मलमल, सिल्कसारखं वजनाला हलकं कापड असेल तर छोटी हेमलाईन आणि जाड कॉटन, ब्रोकेड, टसर सिल्कसारख्या कापडासाठी मोठी हेमलाईन वापरता येईल. कित्येकदा आपल्या ड्रेसच्या हेमला लावलेली बॉर्डर झुकलेली, पोक आलेली दिसते. कारण कापडाचं वजन त्या बॉर्डरपेक्षा कमी असतं. त्यामुळे हा समतोल राखणं गरजेचं आहे. शर्ट ड्रेस, हाय स्लीट कुर्त्यांच्या हेमच्या आतल्या बाजूला त्याच रंगाचं कापड लावण्याऐवजी कॉन्ट्रास्ट प्रिंट किंवा रंगाचं कापड लावा. विशेषत: शर्ट-ड्रेसचा कफ, कॉलर आणि हेमला अशी कॉन्ट्रास्ट पट्टी लावल्यास ड्रेसला नक्कीच एक वेगळा लुक मिळेल. ड्रेसच्या फॉलवरसुद्धा हेमलाईनचं डिटेलिंग अवलंबून असतं.
कित्येकदा टेलरकडून शिवून घेतलेला ‘ए’लाईन ड्रेसचा फ्लेअर त्रिकोणी आकारात दिसतो. टेलरने वर्तुळाकार आकाराऐवजी सरळ रेषेत हेम कापल्यास असं होतं. त्यामुळे फ्लेअर किंवा अनारकली ड्रेसची हेम वर्तुळाकार असेल हे टेलरला सांगायला विसरू नका. यंदाचं वर्ष या हेमलाईनने बरंच गाजवलं आणि येणारं वर्षही हेमलाईनचंच असणार आहे. अनइव्हन हेमलाईन्स यावर्षीचं खास आकर्षण ठरल्या होत्या. अशा हेमलाईन्स शिवताना विशेषत: ड्रेसला स्लीट असल्यास मागच्या आणि पुढच्या हेमच्या फ्लोमध्ये सुसूत्रता असेल याची खात्री करून घ्या. जॉर्जेट, लायक्रा, क्रेपसारख्या कापडाला योग्य हेमलाईन बसणं जिकिरीचं काम असत. कापडाच्या फ्लोमुळे हेमला पोक येतो आणि हलक्या वजनाचे कापड असल्याने बॉर्डर लावून हेम लपवताही येत नाही. अशा वेळी मलमलसारख्या कमी वजनाच्या कापडाची मदत घेता येईल. आतल्या बाजूला हेमपट्टी वापरून पोक लपवता येतो. पण ही हेम लपवण्याऐवजी कॉन्ट्रास वापरून अजून फोकसमध्ये आणा.
आईच्या जुन्या साडय़ा टाकताना त्याच्या बॉर्डर्स कापून घ्यायला विसरू नका. त्या हेमलाईन म्हणून वापरता येतात. हेमलाईनची कौतुकं जितकी कराल तितकी कमी. त्यामुळे पुढच्या वेळी तिच्याकडे जातीने लक्ष द्यायला विसरू नका.

minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
Mahayuti candidate Shrirang Barne reacts on What will be the challenge of the opposition candidate
पिंपरी : विरोधी उमेदवाराचे आव्हान किती असेल? महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, उमेदवार कोण…!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री