पॉवर ड्रेसिंग ही संकल्पना नवी नाही, पण हल्ली या पद्धतीच्या स्टाइलिंगचा वापर वाढला आहे. रुबाब, ऐट आणि जबाबदारी अशी व्यक्तिमत्त्वातली सगळी वैशिष्टय़ं पॉवर ड्रेसिंगमधून व्यक्त होतात. पॉवर ड्रेसिंग नेमकं कसं करावं, यामध्ये काय टाळावं याच्या टिप्स..

पॉवर ड्रेसिंग ही संकल्पना नवी नाही, पण हल्ली या पद्धतीच्या स्टाइलिंगचा वापर वाढला आहे. रुबाब, ऐट आणि जबाबदारी अशी व्यक्तिमत्त्वातली सगळी वैशिष्टय़ं पॉवर ड्रेसिंगमधून व्यक्त होतात. पॉवर ड्रेसिंग नेमकं कसं करावं, यामध्ये काय टाळावं याच्या टिप्स..

  • एरवी सूटसोबत शर्ट घातले जाते, पण त्याऐवजी छानसा टी-शर्ट, टय़ूनिकसुद्धा तुम्ही वापरू शकता. सध्याचा हिवाळ्याचा सीझन लक्षात घेता टर्टलनेक टी-शर्ट सूटसोबत वापरता येईल. शर्ट उठून दिसण्यासाठी अति-कॉन्ट्रास्ट करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा सूट ब्राइट शेडचा असेल तर व्हाइट, क्रीम, ग्रे किंवा फिकट शेडचा शर्ट निवडा.
  • कॉपरेरेट ड्रेसिंगमध्ये आक्रमक स्लोगन, ग्राफिक असलेले टी-शर्ट वापरणं टाळा. त्याऐवजी प्लेन प्लीटेड, फ्लोरल शर्ट वापरू शकता.
  • तुम्ही शूज कोणते घालणार आहात, यावर ट्राऊझर्सची उंची ठरवा. हिल्स घालणार असाल, तर फिटेड अँकल लेन्थ ट्राऊझर्स छान दिसेल. नेहमीची लूझ फिट ट्राऊझर्स घालण्यापेक्षा स्लिम फिट ट्राऊझर्स नक्कीच ट्राय करा. लेदर शूज घालणार असाल तर पायघोळ ट्राउझर्स वापरता येतील. सध्या ट्राऊझर्स रोल अप करून स्नीकर्ससुद्धा वापरले जातात. एखाद्या कॅज्युअल डेला ऑफिससाठी हा लुक ट्राय करता येईल. फॉर्मल मीटिंगसाठी मात्र स्नीकर्स अजिबात नकोत.
  • मुंबईच्या वातावरणात सूटची गरज असतेच असं नाही. त्यामुळे ब्लेझर घालण्यापेक्षा केपप्रमाणे त्याला खांद्यावर ठेऊ शकता.
  • बो टाय, टाय, स्कार्फ हे प्रकार तुमच्या लुकला स्टाइल एलिमेंट देऊ शकतात. एखादी छान बो पीन, टाय पीन किंवा किफ्लग तुमच्याकडे असू द्या. स्मार्ट बेल्टसुद्धा नक्कीच वापरता येईल.
  • सूटसोबत वेगवेगळी ज्युलरी नक्कीच टीम-अप करता येईल. स्टेटमेंट कडं, इअरिरग, िरग किंवा नेकपीस तुम्हाला वापरता येईल.