लग्नाआधी कुंडली पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण कुंडलीतील हे गुण कसे जुळवले जातात हे माहितेय का?
ज्योतिषशास्त्राच्या अनुसार कोणत्या राशी परफेक्ट जोडीदार ठरू शकतात हे जाणून घेऊयात…
मेष – कुंभ : कुंभ राशीची मंडळी ही बुद्धिमान व वेगळा विचार करणारी म्हणून ओळखली जातात, तर मेष राशीच्या मंडळींचा उत्साह व ऊर्जा ही अधिक असते.
प्लॅन तयार करण्यात कुंभ व तो प्रत्यक्षात आणण्यासाठी मेष राशीची लोकं एकमेकांना मदत करू शकतात.
वृषभ- कर्क : वृषभ व कर्क या दोन्ही राशीची लोकं ही स्थैर्य व विश्वास या गोष्टींवर प्रचंड विश्वास ठेवणारी असतात. त्यामुळे दोघांनाही भावनांचे मूल्य जपून ठेवणे उत्तम जमते.
वृषभ रास ही अधिक तर्कशुद्ध असते तर कर्क रास ही अधिक भावनिक असते. यामुळे दोघांना एकमेकांचे गुण बॅलन्स ठेवता येतात. यामुळे प्रेमासह नात्यात समजूतदारपणाही पुरेपूर असतो..
मिथुन- तूळ: मिथुन रास ही प्रेमळ रास मानली जाते. शिवाय ही लोकं आवडत्या व्यक्तीसाठी सर्वकाही करायला तयार असतात.
मिथुन राशीच्या व्यक्तीला आनंदी करण्याची किंबहुना त्यांचे गुण व ऊर्जा मॅच करू शकेल अशी वैशिष्ट्य तूळ राशीत असतात. तूळ ही रास हळवी मानली जाते. त्यामुळे मिथुन व तूळ ही एकमेकांना पूरक असतात.
कन्या- मीन: मीन मीन ही जलतत्त्वाची राशी आहे. कलेची ओढ व प्रेमळ स्वभाव असणारी ही मंडळी जितकी भावविश्वात जगणारी असतात तेवढेच सतर्क असतात.
मीन व कन्या या राशी उत्तम संसार करू शकतात मात्र मीनला शिस्त लावणारी रास हवी असते अन्यथा संसारात स्थैर्य राहात नाही.
टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
नाकावरून कसा कळतो स्वभाव? हे चार प्रकार व गुण ओळखा