बेंबीचा आकार तुमच्याविषयी काय सांगतो? 

Feb 29, 2024

Loksatta Live

सामुद्रिक शास्त्र हे व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीवरून त्यांच्या स्वभावाचे अंदाज बांधणारे शास्त्र आहे.

ऋषी समुद्र यांनी सामुद्रिक शास्त्राविषयी लिहून ठेवले असल्याचे म्हटले जाते. 

आज आपण सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या बेंबीचा आकार व्यक्तिमत्व व आयुष्याविषयी काय सांगतो हे पाहूया..

बेंबी खोल असणाऱ्या व्यक्ती भाग्यशाली मानल्या जातात व त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते असा समज आहे.

ज्या लोकांची बेंबी कमळाच्या पाकळीसारखी वरील दिशेला निमुळती असते त्यांना राजयोग असल्याचे मानले जाते.

ज्यांची बेंबी किंचित उजव्या बाजूला असते ते बुद्धिमान मानले जातात

ज्यांच्या बेंबी किंचित डाव्या बाजूला असते ते शांत स्वभावाचे असतात, व ताण तणाव मुक्त आयुष्य लाभू शकते.

ज्यांच्या बेंबीचा आकार अगदी लहान असतो त्यांना आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो असे म्हणतात

(टीप: ही माहिती प्राप्त संदर्भांवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दुधाचा चहा दिवसातून किती वेळा प्यावा?