चेहरा धुताना 'या' पाच चुका टाळा

प्रतिमा: कॅनव्हा

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Sep 29, 2023

Loksatta Live

त्वचारोगतज्ञ डॉ. आंचल पंथ यांच्या मते, चेहरा धुताना आपण अनेक चुका करतो. यावेळेस त्यांनी चेहरा कसा धुवावा याबाबत सल्ला दिला आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

फेस वॉश लावण्यापूर्वी नेहमी चेहरा पूर्णपणे ओला करा. तसेच फेसवॉश संपूर्ण चेहऱ्यावर सामानरित्या लावावा.

प्रतिमा: पेक्सेल्स

चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर फेसवॉशचा वापर करू नये. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. एका मोठ्या थेंबाच्या आकार इतका फेसवॉश पुरेसा आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

तुमची त्वचा तेलकट असल्यास आणि तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड आधारित फेस वॉश वापरत असल्यास, सक्रिय घटक कार्य करण्यासाठी तुम्हाला चेहरा धुण्यासाठी किमान दोन मिनिटे द्यावी लागतील.

प्रतिमा: कॅनव्हा

चेहरा पुसण्यासाठी मऊ टॉवेल वापरा आणि चेहऱ्यावरील फक्त जास्तीचे पाणी काढून टाका. त्वचेला घासण्याची गरज नाही. 

प्रतिमा: कॅनव्हा

मॉइश्चरायझिंग हा स्कीनकेअर रुटीनमधील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्याच्या सोप्या टिप्स