(Google Photo)

केसांसाठी जबरदस्त फायद्याचे भारताच्या विविध भागातले ८ पारंपरिक हेअर ऑइल्स

Aug 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Google Photo)

नारळाचे तेल- केरळ

हे तेल बनवताना कढीपत्ता आणि जास्वंदाच्या फुलाचाही वापर केला जातो. त्यामुळे टाळूवरील कोंडा रोखता येतो. डोके थंड राहते.

(Google Photo)

भृंगराज तेल - तमिळनाडू

हे तेल डेझी वनस्पतीच्या फुलांपासून बनवले जाते. या तेलाला प्रचंड मागणी आहे. ते केस गळती रोखते आणि केसांना मजबूत बनवते.

(Google Photo)

मोहरीचे तेल - पंजाब

अँटीऑक्सिडंट्स ने समृद्ध, व्हिटॅमिन ई, आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असलेले मोहरीचे तेल, टाळसाठी, त्वचेसाठी चांगले मानले जाते.

(Google Photo)

बदाम तेल - काश्मीर

व्हिटॅमिन ई आणि खनिजांनी समृद्ध असलेले हे तेल केसांचे मूळ मजबुत बनवते. कुरळ्या केसांना सरळ करते. कोरड्या हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त.

(Google Photo)

कडुलिंबाचे तेल-  उत्तर प्रदेश

टाळूला खाज सुटणे, उवावर उपचार म्हणून या तेलाच वापर करण्यात येतो. या तेलाने टाळू चकचकीत दिसू लागते. हे तेल बॅक्टेरियाशी लढते, बुरशी वाढू देत नाही.

(Google Photo)

आवळा तेल - मध्य प्रदेश

उन्हाळ्यात वाळवलेल्या आवळ्यापासून हे तेल बनवले जाते. हे तेल केसांना पांढरे होण्यापासून रोखते. त्यांना मुळापासून मजबुती देते.

(Google Photo)

तिळाचे तेल - गुजरात 

ही तेल आयुर्वेदात खूप महत्वाच आहे. या तेलाने डोक्याची मालिश करण्याचे काम केले जाते. ही टाळूचे पोषण वाढवते तसेच तणाव कमी करते.

(Google Photo)

महुआ तेल - छत्तीसगड आदिवासी तेल

हे तेल महुआ झाडाच्या बियांपासून काढले जाते. हे तेल आदिवासी लोक स्वयंपाकासाठीही वापरतात. तसेच ते टाळूसाठी फायदेशिर आहे. केसांना नैसर्गिक चमक देते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

या ९ गोष्टी करुन पावसाळ्यात तुमच्या त्वचेला जपा