(Photo: Freepik)

स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे?

Mar 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

आजच्या काळात मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे.

(Photo: Freepik)

या सततच्या स्क्रीन वापराचा सर्वांत जास्त वाईट परिणाम आपल्या नाजूक डोळ्यांवर होत असतो.

(Photo: Freepik)

डोळ्यांवर सतत ताण पडल्यामुळे कालांतराने डोळ्यांखाली गडद काळी वर्तुळे निर्माण होतात.

(Photo: Freepik)

ही काळी वर्तुळे घालवण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतो.

(Photo: Freepik)

त्यासाठी तुम्हाला केवळ कॉफी, मध, हळद व कच्चे दूध यांसारख्या किचनमधील साहित्याची गरज आहे.

(Photo: Freepik)

सुरुवातीला एका वाटीत एक चमचा कॉफी पावडर घेऊन, त्यात फक्त चिमूटभर हळद मिसळा.

(Photo: Freepik)

त्यानंतर त्यात प्रत्येकी एक चमचा कच्चे दूध आणि मध टाकून मिश्रण तयार करा.

(Photo: Freepik)

 हे सर्व घटक व्यवस्थित एकत्र करून, त्याची एक मऊ आणि दाट पेस्ट बनवून घ्या.

(Photo: Freepik)

 ही पेस्ट डोळ्यांखालील भागावर हळुवार लावून, २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुऊन स्वच्छ करा.

(Photo: Freepik)

या उपायाचा नियमित वापर केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू नाहीशी होतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी सकाळी केळी खाणे फायदेशीर आहे का?