(Photo: Freepik)

टॉवेलच्या मदतीने ब्लॅकहेड्स काढण्याचा ‘हा’ सोपा मार्ग

Aug 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

ब्लॅकहेड्स म्हणजे चेहऱ्यावरील लहान काळे ठिपके. हे त्वचेच्या छिद्रात जमा झालेल्या तेल व धुळीमुळे होतात.

(Photo: Freepik)

सोप्या टॉवेलच्या मदतीने ब्लॅकहेड्स सहज दूर करता येतात.

(Photo: Freepik)

 सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील धूळ, मेकअप आणि सनस्क्रीन निघून जातं.

(Photo: Freepik)

 मऊ टॉवेल गरम पाण्यात भिजवा, पिळून चेहऱ्यावर १-२ मिनिटं ठेवा.

(Photo: Freepik)

 पाण्यात टी ट्री ऑइल किंवा लॅव्हेंडर ऑइलचे थेंब घातल्यास स्पा-इफेक्ट मिळतो.

(Photo: Freepik)

 टॉवेल हलक्या गोलाकार हालचालींनी त्वचेवर फिरवा. ब्लॅकहेड्स आणि डेड स्किन सहज सुटते.

(Photo: Freepik)

जास्त दाब देऊ नका. हलक्या हाताने केलेली मसाज पुरेशी आहे. थंड पाण्याने चेहरा धुवा, पोर्स बंद होतात व त्वचेला फ्रेश लूक मिळतो.

(Photo: Freepik)

 हलका, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा. त्वचा हायड्रेटेड राहते. हा उपाय सोपा, जलद आणि खिशाला परवडणारा आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

'या' फळांच्या बियांमध्येच दडलेय आरोग्याचे गुपित; वाचा, काय आहेत फायदे...