रणबीर पासून रश्मिकापर्यंत, जाणून घ्या 'अ‍ॅनिमल'च्या संपूर्ण स्टारकास्टचे मानधन

Nov 28, 2023

Loksatta Live

अ‍ॅनिमल हा चित्रपट १ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने अ‍ॅनिमल चित्रपटासाठी ७० कोटी रुपये मानधन घेतले आहे.

बॉबी देओलने या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेतल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्सनी केला आहे.

रश्मिका मंदानाला 'अ‍ॅनिमल'मधील तिच्या भूमिकेसाठी 4 कोटी रुपये मिळाले आहेत.

अनिल कपूरने 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. यासाठी अनिल कपूरने 2 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

या चित्रपटात शक्ती कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शक्ती कपूरला या भूमिकेसाठी 30 लाख रुपये मिळाले आहेत.