(Photo: Nitin Desai/Instagram)

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

Aug 02, 2023

Loksatta Live

(Photo: Nitin Desai/Instagram)

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडीओत गळफास घेऊन जीवन संपवले

(Photo: Nitin Desai/Instagram)

ते ५८ वर्षांचे होते

(Photo: Nitin Desai/Instagram)

त्यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीतील सगळ्यांनाच धक्का बसला आहे

(Photo: Nitin Desai/Instagram)

'१९४२ अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' अशा चित्रपटांसाठी भव्य आणि देखणे सेट नितीन देसाई यांनी उभारले होते

(Photo: Nitin Desai/Instagram)

हिंदी आणि मराठीतील ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हणजे नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि भव्य सेट्स हे समीकरणच बनले होते

(Photo: Nitin Desai/Instagram)

पुढे हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी २००५ साली कर्जत येथे भव्यदिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला

(Photo: Nitin Desai/Instagram)

चित्रपटातील भव्य दिव्य सेट्सची ही अद्भुत दुनिया एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांनाही खुली करून दिली होती

(Photo: Nitin Desai/Instagram)

चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर काम केले होते

(Photo: Nitin Desai/Instagram)

'राजा शिवछत्रपती' या ऐतिहासिक मालिकेबरोबरच 'बालगंधर्व' या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पैठणी साडीत सुखदा खांडकेकरचं मोहक रुप