(Photo: Instagram)
Jun 30, 2025
(Photo: Instagram)
प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
(Photo: Instagram)
अभिनेता मुकुल देव यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले, त्यांचे निधन प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाले. मुकुल देव यांनी 'सन ऑफ सरदार', 'दहशत' आणि 'चायना गेट' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
(Photo: Instagram)
बिग बॉस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो 40 वर्षांचा होता. 2 सप्टेंबर 2021 रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला.
(Photo: Instagram)
पुनीत राजकुमार या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (heart attack) निधन झाले. त्या दिवशी तो जिममध्ये वर्कआउट करत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
(Photo: Instagram)
अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे 30 जून 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
(Photo: Instagram)
राजू श्रीवास्तव यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले. 10 ऑगस्ट 2022 रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे ते व्हेंटिलेटरवर होते. 21 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
(Photo: Instagram)
‘कसोटी जिंदगी की'मधील अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याने ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. जिममध्ये व्यायाम करत असताना त्यालाही हृदयविकाराचा झटका आला होता.
(Photo: Instagram)
सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू १४ जून २०२० रोजी झाला. मुंबईतील त्याच्या वांद्र्यातील घरात त्याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले गेले आहे.
(Photo: Instagram)
प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथे एका कॉन्सर्टनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘कांटा लगा’ गाण्यासाठी शेफाली जरीवालाला मिळालेले फक्त ‘इतके’ पैसे