थंडीपासून असे रक्षण करा आपल्या हातांचे...  

Nov 21, 2023

Loksatta Live

थंडीमध्ये आपल्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच आपल्या हातांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. कारण, हातही थंड पडतात.

थंडीमध्ये हातांच्या रक्षणासाठी हातमोजे घालत असले तरी तज्ज्ञांच्या मते, थंडीत मिटन्स वापरावेत.

डॉ. दिलीप गुडे यांच्या मते, “हातमोजांमध्ये प्रत्येक बोटाला स्वतंत्र भाग असतो. मिटन्समध्ये चार बोटांसाठी एक आणि अंगठ्यासाठी स्वतंत्र भाग असतो.''

हातमोजांपेक्षा मिटन्स वापरणे हातांसाठी चांगले असते. हाताची चारही बोटे एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये नैसर्गिक ऊब तयार होते, असे डॉ गुडे म्हणाले. 

डॉ. गुडे पुढे म्हणाले की, मिटन्स ग्रीपसाठीही चांगले असतात. इतर कामे करताना हातमोजांमुळे होणारे अपघात मिटन्समध्ये कमी प्रमाणात होतात.

हातमोजांच्या तुलनेत मिटन्स वापरणे अधिक सोयीस्कर आहे