कियाराने सांगितले चमकदार त्वचेमागील घरगुती ब्युटी सीक्रेट

Feb 16, 2025

Loksatta Live

Photo : Kiara Advani/Instagram

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. चित्रपटांबरोबर तिच्या सुंदर त्वचा व केसाचीसुद्धा नेहमी चर्चा होते. 

Photo : Kiara Advani/Instagram

तुम्हाला माहितीये का कियारा तिच्या त्वचेची कशी काळजी घेते? तिच्या सौंदर्यामागील रहस्य काय आहे?

Photo : Kiara Advani/Instagram

मुंबईतील तिरा स्टोअर (Tira) लाँचच्या वेळी, कियारा ही लाल रंगाच्या कपड्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.

Photo : Kiara Advani/Instagram

Vogue India शी बोलताना कियाराने तिच्या आजीचे सौंदर्य रहस्य आणि स्वतःच्या काही टिप्स सांगितल्या.

Photo : Kiara Advani/Instagram

कियारा आजीकडून मिळालेल्या टिप्सविषयी सांगताना म्हणाली, “थोडे बेसन, थोडे घरगुती दूध किंवा त्यावरील मलाई व थोडे मध टाकावे. याची पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी."

Photo : Kiara Advani/Instagram

ती पुढे सांगते, “माझ्या आजीने मला दिलेला हा सर्वोत्तम डिटॉक्स मास्क आहे. पण त्याबरोबर तुम्ही खात असलेले फळ किंवा भाज्यांची सालेसुद्धा चेहऱ्यावर घासू शकता. तसे करणे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.”

Photo : Kiara Advani/Instagram

कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट, डर्मेटो-सर्जन आणि डर्मेटोलॉजिस्ट सल्लागार डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले, “बेसन, दूध किंवा मलाई व मध यांपासून तयार केलेला घरगुती फेस मास्क आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि हा फेस मास्क एक नैसर्गिक डिटॉक्स मानला जातो.”

Photo : Kiara Advani/Instagram

घरगुती फेस मास्क तुमची त्वचा स्वच्छ करण्यास, त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास, तसेच त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकतो.

Photo : Kiara Advani/Instagram

बेसनमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत. एक्सफोलिएटिंग ही त्वचा स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे; ज्यामुळे त्वचेची बंद झालेली छिद्रे उघडण्यास मदत होते.

Photo : Kiara Advani/Instagram

हा फेस मास्क महिन्यातून एकदा किंवा दोनदा वापरण्याचा सल्ला डॉ. रिंकी कपूर देतात.