(Photo Credit: Instagram)
Sep 01, 2025
(Photo: Unsplash)
अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, विशेषतः कॅटेचिन्स (EGCG), जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
(Photo: Unsplash)
ग्रीन टी मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामधील एल-थेनाइन आणि EGCG या कॅटेचिनमुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते, तसेच अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
(Photo: Unsplash)
काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की ग्रीन टीमधील घटक स्तन प्रोटेस्ट आणि कोलोरेक्टल कर्करोगासारखे धोके कमी करतात.
(Photo: Unsplash)
एलडीएल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे ह्रदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका कमी होतो.
(Photo: Unsplash)
जपानच्या एका संशोधनानुसार नियमित ग्रीन टी पिल्याने ह्रदयरोगामुळे होणार्या मृत्यचा धोका कमी होतो, ज्यामुळे दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळते.
(Photo: Unsplash)
ग्रीन टीमधील कॅटेचिनमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात जे प्लेक, तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास व हिरड्यांच्या आजारांचा धोका कमी करतात.
(Photo: Unsplash)
ग्रीन टी इन्सुलिन संवेदनशिलता वाढवते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते व मधुमेहाचा धोका कमी होतो.
(Photo: Unsplash)
ग्रीन टी चयापचय क्रिया वाढवते आणि चरबी जाळण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ॲमेझॉन प्राईमच्या ‘या’ आगामी सिरीजमध्ये झळकणार श्वेता तिवारी