वजन कमी करण्यासाठी तुम्ही धावता का? आताच थांबवा...

Apr 23, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेक जण वजन कमी करण्यासाठी धावण्याचा मार्ग निवडतात, पण खरंच धावणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का? 

(Photo : Unsplash)

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी धावणे एक चांगला पर्याय आहे, पण वजन कमी करण्याचा थेट उपाय नाही. हो, हे खरंय.

(Photo : Unsplash)

द इंडियन एक्स्प्रेसनी फिटनेसतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या हवाल्याने या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. 

(Photo : Unsplash)

जर कोणी वजन कमी करण्याचा विचार करत असेल तर सुरुवातीला धावणे सुरू करतात. गरिमा गोयल सांगतात, "धावण्याचे निःसंशयपणे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत, पण वजन कमी करताना फक्त धावण्यावर अवलंबून राहू नका. या बरोबरच पचनशील असा आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे."

(Photo : Unsplash)

निरोगी जीवनासाठी शरीरात ऊर्जा असणे अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करताना ऊर्जा संतुलित ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे. आपण किती कॅलरीयुक्त आहार घेतला आणि वजन कमी करताना किती कॅलरी बर्न केले, याचा समतोल राखणे आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

धावताना कॅलरी कमी होतात, पण याचा परिणाम शरीरातील ऊर्जेवर पडू नये, हे समजून घेणे गरजेचे आहे.

(Photo : Unsplash)

आपले शरीर खूप लवकर कोणत्याही गोष्टीमध्ये अनुकूलता दाखवते. जेव्हा वजन कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती धावायला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण कमी असू शकते.

(Photo : Unsplash)

पण, कॅलरी बर्न करण्यासाठी जर तुम्ही सातत्याने आणि खूप जास्त वेळ धावत असाल तर यामुळे शरीरातील ऊर्जेचा अधिक वापर केला जातो, ज्यामुळे वजन कमी करणे कमी होते. यासाठी व्यायाम करताना थोडा फार बदल करणे आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

गोयल सांगतात, "खूप जास्त धावण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आहार घेण्याची पद्धत आणि जीवनशैलीकडे दुर्लक्ष होऊ शकते. दीर्घकाळासाठी वजन कमी करताना चांगला आहार, तणावमुक्त राहणे आणि चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे."

(Photo : Unsplash)

"वय, आनुवंशिकता, हार्मोनल चढउतार आणि पूर्वीपासून जर तुम्हाला एखादी आरोग्याची समस्या असेल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी धावत असाल, तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो."