मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचे सेवन करावे का?

Apr 21, 2024

Loksatta Live

Photo : Freepik)

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात उसाचा ताजा आणि थंडगार रस पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Photo : Freepik)

उसाचा गोडपणा आणि त्यापासून मिळालेल्या पौष्टिक फायद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऊस हा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनक्रियेस मदत करतो.

Photo : Freepik)

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी उसाचे फायदे सांगितले आहे.

Photo : Freepik)

हायड्रेशन – उसाचा ताजा आणि थंडगार रस शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतो आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.

Photo : Freepik)

पचनशक्ती – उसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात; जे पचनाशी संबंधित समस्या दूर करतात.

Photo : Freepik)

ऊर्जा वाढवते – उसामध्ये असलेली नैसर्गिक साखर दिवसभर ऊर्जा टिकविण्यास मदत करते.

Photo : Freepik)

इलेक्ट्रोलाइट संतुलन – उसामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात; ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत होते.

Photo : Freepik)

अँटिऑक्सिडंट्स – उसामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात; जी शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात

Photo : Freepik)

उसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात उसाचे सेवन करावे. त्याचबरोबर रक्तातील साखरेची मात्रा नियमित तपासणे गरजेचे आहे.