'ही' आहेत कर्करोगाची लक्षणे आणि कारणे

Nov 29, 2023

Loksatta Live

कर्करोग हा कोणालाही होऊ शकतो. कर्करोगाची कारणे आणि लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे 

कर्करोगाची लक्षणे : कर्करोग हा एक किचकट आजार आहे. कधी कधी वर्षानुवर्षे त्याची लक्षणे दिसत नाही. काही वेळा लक्षणे वाटली, तरी तो कर्करोग असेल असे नाही 

कर्करोगाची काही लक्षणे : वजन कमी होणे

खूप वेळा थकवा येतो, बहुतेक रात्री ताप येतो

त्वचेचा रंग बदलतो, पोत बदलतो, तीळ येण्याचे प्रमाण बदलते 

कर्करोगाची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार करणे आवश्यक असते 

त्वचेच्या खाली गाठी किंवा जाडसर भाग जाणवतो

श्वास घेण्यास, अन्न गिळण्यास त्रास होतो 

कर्करोगाची कारणे : कर्करोग हा काही प्रमाणात  अनुवांशिक आजार आहे.

सर्व कर्करोगांपैकी ५% ते १२% कर्करोग हे अनुवांशिक उत्परिवर्तनांमुळे होतात, जे आपण नियंत्रित करू शकत नाही.