हाय ब्लड शुगरचा तुमच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. तुमच्या रेटिनाच्या ब्लड वेसेल्समध्ये बदल होऊ शकतो

तसंच डोळ्यांच्या टिशूजमध्ये सूज येऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला धूसर दिसू शकत.

हाय ब्लड शुगर मुळे लेन्सच्या आकारात बदल होतो. वेळीस उपचार न केल्यास मोतीबिंदू, काचबिंदू आणि रेटिनोपॅथी या समस्या उद्भवू शकतात.

रक्तातील साखर ही तुमच्यासाठी मुख्य ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करते, परंतु जर तुम्हाला उच्च रक्तातील साखरेची समस्या असेल, तर ग्लुकोज तुमच्या पेशींमध्ये पोहोचत नाही आणि रक्तप्रवाहातच राहते. त्यामुळे दृष्टी कमी होणे आणि अंधत्व येण्याच्या समस्या उद्भवू शकतात.

मधुमेहामुळे तुम्हाला डोकेदुखी, डोळा दुखणे, डोळ्यात पाणी येणे असा त्रास होऊ शकतो.

अस्पष्ट दृष्टी ही पहिली आणि प्रमुख लक्षण आहे.