दुधाच्या चहाने वजनावर खरंच परिणाम होतो का?

Feb 22, 2024

Loksatta Live

अनेकजण वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दूध टाळण्याचा पर्याय निवडतात. पण याची गरज आहे का?

खरंतर चहामध्ये दूध घातल्याने जोडल्या जाणाऱ्या कॅलरीज या सहज नियंत्रणात ठेवता येतात

मूळ समस्या ही अधिक साखरेचा वापर आणि जोडीला खाल्ल्या जाणाऱ्या टोस्ट, बटर, खारी, बिस्किटांमुळे निर्माण होते

हायपर ऍसिडिटी, उच्च कॉर्टिसॉल, तणावग्रस्त लोकांनी सारखा चहा घेणे टाळावे

प्रमाणाच्या बाहेर चहाचे सेवन हे शरीरात मिनरल्सच्या पोषणात अडथळा आणते त्याचा वजनावर परिणाम होऊ शकतो

साखरेचे प्रमाण सुद्धा कमी करावे, चहा किंवा दुधापेक्षा साखर हा घातक पदार्थ ठरतो

ब्राऊन शुगरचा पर्याय विचारात घ्या

दिवसातून दोन वेळा चहाचे सेवन प्रमाणात करणे हे फार घातक ठरत नाही.

दोन पेक्षा जास्त कप चहाची सवय कमी करायची असेल तर वरचे सगळे कप हे ग्रीन टी किंवा कोरा चहा अशा पर्यायाचे ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गॅस बर्नरवर पोळी भाजल्याने कर्करोगाचा धोका वाढतो का? तज्ज्ञांचं उत्तर वाचा