(Photo: Pexels)

भेंडीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे...

May 10, 2025

सुनिल लाटे

(Photo: Pexels)

भेंडीची फक्त भाजीच नाही, तर तिचे पाणीदेखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. या पाण्यामधील समृद्ध पोषक घटकांमुळे काय फायदे मिळतात ते जाणून घेऊ

(Photo: Pexels)

ज्यांना वारंवार अपचन, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता यांचा त्रास होतो, त्यांनी काही दिवस नियमितपणे भेंडीचे पाणी घ्यावे. भेंडीचे पाणी नियमित प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया सुधारते.

(Photo: Pexels)

भेंडीमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

(Photo: Pexels)

भेंडीमध्ये फायबर आणि प्रथिने असतात. हे वजन कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.

(Photo: Pexels)

भेंडीमधील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात

(Photo: Pexels)

भेंडीचे पाणी प्यायल्याने त्वचेसाठी अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते मुरमे कमी करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

(Photo: Pexels)

भेंडीचे पाणी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, हार्मोन्स नियंत्रणात आणि यकृताच्या आरोग्यास देखील मदत करते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जगातील सर्वात लहान कुत्रा पाहिला का?