(Photo: Freepik)

फिटनेससाठी मांसाहार नको! ‘हे’ ८ शाकाहारी पदार्थ देतील ताकद आणि प्रथिनं

Jul 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मूगडाळ

मूगडाळ हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. १०० ग्रॅममध्ये सुमारे २४ ग्रॅम प्रथिने मिळतात.

(Photo: Freepik)

 पनीर 

पनीरमध्ये उच्च प्रमाणात प्रथिने असतात. त्यामध्ये केसीन नावाचं प्रथिन असतं, ते दीर्घकाळ शरीराला ऊर्जा पुरवतं.

(Photo: Freepik)

टोफू/सोयाबीन

सोयामध्ये भरपूर प्रथिनं असतात. त्यातील ‘टोफू’ हा एक  मांसाहाराला उत्कृष्ट असा पर्याय आहे.

(Photo: Freepik)

दही

दह्यामध्ये प्रो-बायोटिक्सबरोबरच चांगल्या दर्जाची प्रथिनं असतात. जिमनंतर स्नॅकसाठी तो उत्तम पर्याय आहे.

(Photo: Freepik)

चणाडाळ/कडधान्यं

राजमा, हरभरा, चवळी, चणाडाळ हे सगळे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. त्यातून फायबर आणि मिनरल्सही मिळतात.

(Photo: Freepik)

बदाम

बदाम हे आरोग्यदायी चरबी आणि प्रथिनांचं मिश्रण आहे. १०० ग्रॅम बदामांमध्ये सुमारे २१ ग्रॅम प्रथिनं असतात.

(Photo: Freepik)

ओट्स

ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्सबरोबर प्रथिनेही भरपूर असतात.

(Photo: Freepik))

क्विनोआ (Quinoa)

क्विनोआ हे एक संपूर्ण प्रथिनयुक्त धान्य आहे. त्यामध्ये नऊ आवश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात. 

(Photo: Freepik)

(टीप : तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य त्या प्रमाणात सेवन करा.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्वयंपाकात वापरताय का ‘ही’ ८ तेलं? आहारतज्ज्ञ देतायत गंभीर इशारा