वजन कमी करताना चहा कसा प्यावा?

Apr 23, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेक जण वजन कमी करताना चहाचे सेवन करणे टाळतात.

(Photo : Unsplash)

तुम्ही सुद्धा चहा पिणे टाळता का? टेन्शन घेऊ नका, जाणून घ्या वजन कमी करताना चहा कसा प्यावा?

(Photo : Unsplash)

चहाचे सेवन दररोज दोन कपपर्यंत मर्यादित ठेवा; जेणेकरून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि वजनदेखील नियंत्रित ठेवू शकतो.

(Photo : Unsplash)

जेवणाच्या आधी किंवा नंतर चहा पिणे टाळा. कारण- त्यामुळे पचनक्रिया आणि पोषक घटकांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

चहा पिणे आणि जेवण करणे यात कमीत कमी ३० मिनिटांचे अंतर ठेवा.

(Photo : Unsplash)

 जर तुम्हाला चिंता, झोपेचे विकार किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील, तर झोपेच्या वेळी चहा पिणे टाळा.

(Photo : Unsplash)

अॅसिडिटी टाळण्यासाठी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा.

(Photo : Unsplash)

खरे तर वजन वाढू नये यासाठी चहामधील साखरेचे प्रमाण कमी करा आणि कमी फॅटचे दूध वापरा; जेणेकरून तुम्हाला तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवता येईल.