(Photo: Unsplash)

महिनाभर दररोज फक्त एक केळी खाल्ली तर काय होईल?

Aug 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

एका केळीमध्ये १०५ कॅलरीज ३ ग्रॅम फायबर, ४२२ मिलीग्राम पोटॅशियम, १० टक्के डीव्ही व्हिटॅमिन सी व २५ टक्के डीव्ही व्हिटॅमिन बी-६ असते.

(Photo: Unsplash)

केळीतले कार्बोदके, विशेषत: स्टार्च आणि नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रुक्टोज, आणि सुक्रोज), शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात.

(Photo: Unsplash)

पचनक्रियेसाठी व आतड्यांमधील बॅक्टेरियांना पोषण देणारे प्रीबायोटिक्स पुरवते त्यामुळे त्यांचे कार्य चांगले होते.

(Photo: Unsplash)

केळीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

मूड सुधारू शकतो कारण केळीत ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड असते, जे शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते. हे दोन्ही न्यूरोट्रांसमीटर मूड आणि झोपेचे नियमन करत असतात.

(Photo: Unsplash)

केळीमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे वजन वाढवण्यासाठी आवश्यक ऊर्जा देतात.

(Photo: Unsplash)

केळीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते, तसेच त्वचेला निरोगी ठेवते. 

(Photo: Unsplash)

ज्यांना मधुमेह, किडनीचे आजार किंवा पचनाच्या समस्या आहेत. त्यांना दिवसातून २-३ पेक्षा जास्त केळी खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज पेर खाण्याचे ७ जबरदस्त फायदे…