(Photo: social media)
May 01, 2025
(Photo: social media)
बदाम हे एक सुपरफूड आहे जे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदमामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्याचे आपल्याला अनेक फायदे मिळतात.
(Photo: social media)
उन्हाळ्यात बदाम खावे की नाही?दरम्यान, उन्हाळ्यात बदाम खावे की नाही? याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया आणि उन्हाळ्यात बदाम खाण्याची योग्य पद्धत देखील जाणून घेऊया.
(Photo: social media)
उन्हाळ्यात आपण बदाम खाऊ शकतो का?बदाम हे उष्ण असतात, म्हणून उन्हाळ्यात ते मर्यादित प्रमाणात खावेत. जास्त बदाम खाल्ल्याने पित्त दोष वाढू शकतो आणि शरीरात उष्णता वाढू शकते.
(Photo: social media)
वजन उन्हाळ्यात बदाम खाण्याची पद्धतउन्हाळ्यात नेहमी भिजवलेले बदाम खावेत. यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर त्यांची साल काढून सकाळी खा. यामुळे बदामाची उष्णता कमी होते.
(Photo: social media)
उन्हाळ्यात बदाम खाण्याचे फायदेउन्हाळ्यात बदाम योग्य प्रकारे खाल्ले तर शरीराला अनेक फायदे मिळतात. बदामामध्ये असलेले पोषक तत्व तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्याचे काम करतात.
(Photo: social media)
वजन कमी करण्यासाठी फायदेशीरबदामांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. बदाम खाल्ल्याने भूक नियंत्रित मिळवता येते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
(Photo: social media)
हृदयाची आणि मनाची काळजीबदामामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूचे कार्य सुधारतात. शिवाय, ते कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रित करतात.
(Photo: social media)
रक्तातील साखर नियंत्रित करता येतेमधुमेहाच्या रुग्णासाठी बदाम एक उत्तम ब्रेकफास्टचा पर्याय आहे. तो केवळ शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करत नाही तर रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवतो
(Photo: social media)
पचनक्रिया निरोगीबदामांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. याशिवाय, ते चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस देखील मदत करतात, ज्यामुळे तुमचे पचन व्यवस्थित राहते.
(Photo: social media)
केस आणि त्वचेसाठी वरदानबदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात. बदामाचे सेवन नवीन पेशींच्या निर्मितीस देखील मदत करते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सकाळी हळू चालल्याने शरीराला मिळतात ‘हे’ ८ जबरदस्त फायदे