संध्याकाळी व्यायाम केल्याने खरंच वजन लवकर कमी होते?

(Photo : freepik)

Jun 12, 2024

Loksatta Live

(Photo : freepik)

एका नवीन ऑस्ट्रेलियन अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, संध्याकाळी व्यायाम केल्याने लठ्ठपणा दूर करण्यास मदत होऊ शकते.

(Photo : freepik)

'डायबिटीज केअर'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, संध्याकाळी ६ नंतर ते मध्यरात्रीदरम्यान केलेला अॅरोबिक व्यायाम लठ्ठपणाशी सामना करण्यास मदत करतो.

(Photo : freepik)

पण, व्यायामासाठी खरोखर ही चांगली वेळ आहे का? द इंडियन एक्स्प्रेसने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

(Photo : freepik)

सकाळचा व्यायाम तुमची चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे दिवसभर कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.

(Photo : freepik)

सकाळी उपाशीपोटी व्यायाम केल्याने फॅट्सचे ऑक्सिडेशन वाढते आणि इन्सुलिनची पातळी सुधारते. त्यामुळे फॅट्स कमी करणे, हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(Photo : freepik)

जे लोक उशिरा उठतात किंवा शिफ्टमध्ये काम करतात अशा लोकांना सकाळचा व्यायाम करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी संध्याकाळी व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.

(Photo : freepik)

संशोधनात सांगितले आहे की, स्नायूंची ताकद दुपारनंतर किंवा संध्याकाळी लवकर वाढते. त्यामुळे संध्याकाळचा व्यायाम अधिक प्रभावीपणे करता येतो.

(Photo : freepik)

'अमेरिकन कॉन्सिल ऑन एक्सरसाइज'च्या मते, जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान खूप जास्त असते म्हणजेच दुपारनंतर तुम्ही व्यायाम करू शकता.

(Photo : freepik)

"मधुमेह असलेल्यांनी रात्री जर व्यायाम केला, तर सकाळी त्यांच्या ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते; जी चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

(Photo : freepik)

जर टाईप-२ मधुमेह किंवा लठ्ठपणा असेल ,तर संध्याकाळी ६ ते मध्यरात्रीदरम्यान ते व्यायाम करू शकतात," असे मत मोहाली येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीनचे संचालक डॉ. गुरप्रीत सिंग बाबरा यांनी व्यक्त केले.

(Photo : freepik)

जास्त व्यायाम करणे धोक्याचे?