मिठी मारल्याने 'हे' आजार होतात दूर

(Photo : Unsplash)

Apr 03, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आपल्यापैकी प्रत्येकालाच मिठी मारायला आवडते. आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने आपल्याला चांगले वाटते आणि प्रेमाची भावना जागृत होते.

(Photo : Unsplash)

पण मिठी मारण्याचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

(Photo : Unsplash)

केवळ व्यक्तीलाच नाही तर पाळीव प्राण्याला किंवा तुमच्या आवडत्या ब्लँकेटला मिठी मारल्याने देखील तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

मिठी मारल्याने किंवा कडलिंग केल्याने तुमचं ताण कमी होऊ शकतो. ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे.

(Photo : Unsplash)

मिठी मारल्याने शरीरात ऑक्सिटोसिन सोडण्यास मदत होते आणि शरीरातील कोर्टिसॉलची पातळी कमी होते. परिणामी आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते.

(Photo : Unsplash)

मिठी मारल्याने आपल्याला आराम आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्हणूनच मिठी मारून झोपल्याने आपले झोपेचे चक्र सुधारते.

(Photo : Unsplash)

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या स्पर्शाने दुखपतीच्या वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

आपल्या प्रिय व्यक्तीला नियमितपणे मिठी मारल्याने सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारापासून बचाव होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

तुमच्या नात्यातील स्पार्क परत आणण्यासाठी आणि जोडीदारासोबत तुमचे लैंगिक संबंध सुधारण्यासाठी कडलिंग मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Tips: उन्हाळ्यात आवळ्याचे सेवन दूर करेल ‘या’ समस्या