'हे' पदार्थ ठेवतील तुमचे मानसिक आरोग्य संतुलित  

Dec 07, 2023

Loksatta Live

तुमच्या आहारातील काही पदार्थ तुमच्या मनावरही परिणाम करत असतात. त्यामुळे मानसिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे 

व्हिटॅमिन बी 1: व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता असल्यास थकवा, हृदयाच्या समस्या, मज्जातंतूंचे नुकसान अशा समस्या उद्भवतात. यासाठी तुम्ही आहारात काजूचा समावेश करू शकता 

व्हिटॅमिन B2: व्हिटॅमिन B2 च्या कमतरतेमुळे थकवा, घसा खवखवणे, अंधुक दृष्टी आणि नैराश्य येऊ शकते. तुमची त्वचा फुटू शकते. सूज येणे, खाज येणे अशी लक्षणे दिसतात. तुम्ही आहारात शेंगदाण्यांचा समावेश करू शकता.

नाचणी: तुम्ही नाचणीचा आहारामध्ये समावेश करू शकता. नाचणी ही आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चांगली असते. गहू किंवा मैद्याच्या ऐवजी नाचणीचा समावेश आहारामध्ये करावा 

वाटाण्याच्या बियाही गुणकारी असतात 

अक्रोड: तुम्ही तुमच्या आहारात अक्रोडाचा विविध प्रकारे समावेश करू शकता. तुम्ही ते सकाळी लवकर भाजून किंवा भिजवू शकता किंवा तुमच्या न्याहारी लापशी, स्मूदी आणि सॅलडमध्ये घालू शकता.

बार्ली: बार्ली हे एक व्हिटॅमिन बी २ ने समृद्ध धान्य आहे.  याची खिचडी छान लागते 

व्हिटॅमिन B3 : व्हिटॅमिन B3 मुळे मेंदूचे कार्य चांगले राहते. तांदूळ, बाजरी, मूग, बदाम आणि खजूर यामध्ये व्हिटॅमिन B3 असते. मानसिक आरोग्यासाठी हे पदार्थ महत्त्वाचे आहेत