(Photo: Pexels)

सकाळची सुरूवात चहा, कॉफीऐवजी 'या' ८  आरोग्यदायी पेयांनी करा...

Aug 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

सकाळची सुरूवात

तुम्ही दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करत असाल. परंतु चहा आणि कॉफी शरीराला डीहायड्रेट करत असतात. त्यापेक्षा कोमट लिंबू पाण्यापासून ते नारळ पाण्यापर्यंत काही पारंपरिक भारतीय पेय सकाळी जर तुम्ही पिले तर तुम्हाला नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होईल.

(Photo: Pexels)

कोमट लिंबू पाणी

यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट भरपूर असतात त्यामुळे पचनक्रिया उत्तेजित होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रात्रीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते.

(Photo: Pexels)

नारळ पाणी

नैसर्गिक एनर्जी बूस्टर नारळ पाणी डीहायड्रेशनवर सगळ्यात समृद्ध उपाय आहे, यामुळे थकवा टळतो. नैसर्गिकरीत्या तुम्ही शरीराला संतुलित करता, हा कॉफी व चहापेक्षा एक उत्तम पर्याय आहे.

(Photo: Pexels)

काकडीचे पाणी

यामध्ये कॅलरीज कमी असतात पण ते शरीराला ताजेतवाने करण्यात उत्तम आहे. तसेच शरीराला थंड करते आणि पोटफुगी असेल तर ती कमी करण्यात मदत करते.

(Photo: Pexels)

जिरे पाणी

कोमट पाण्यात भिजवलेले जिरे पचनास अतिशय उपयुक्त आहेत. ते चयापचे वाढवतात आणि नैसर्गिकरित्या विषारी पदार्थ बाहेर काढतात. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे.

(Photo: Pexels)

ताक

 दह्यापासून बनवलेले हलके आणि पातळ भारतीय प्रोबायोटिक पेय छास किंवा ताक आतड्यांचे आरोग्य हायड्रेशन आणि पोट थंड करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

(Photo: Pexels)

कोरफडीचा रस

विषारी पदार्थ काढून टाकणारा आणि पचनासाठी आरामदायी असलेला कोरफडीचा रस पाण्यात मिसळून पिल्यास हायड्रेशन आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

(Photo: Pexels)

तुळशीचे पाणी

तुळशीची पाने रात्रभर भिजवून ठेवल्याने आणि सकाळी ते कोमट पाण्यातून पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि तुमचे शरीर हायड्रेट राहते.

(Photo: Pexels)

चिया बियाणांचे पाणी

चिया बिया पाणी शोषून घेतात आणि जेलसारखी पोत तयार करतात, ज्यामुळे ते दीर्घकाळ हायड्रेशन साठी उत्कृष्ट असतात. शरीराला फायबर प्रदान करतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भारतातली ‘ही’ ८ आरोग्यदायी पेये तुम्हाला माहितीयेत का?