थंडीमध्ये ट्राय करा नाचणीची कोशिंबीर 

Nov 30, 2023

Loksatta Live

थंडीच्या काळात पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. सतत एकाच प्रकारचे पौष्टिक अन्न घेणे कंटाळवाणे होऊ शकते. तसेच सात्विक जेवण करण्यास वेळही लागतो  

थंडीमध्ये नाचणी आरोग्यासाठी चांगली असते. रोज नाचणीची भाकरी बनवण्यापेक्षा  नाचणीचे कोशिंबीरही बनवू शकता. त्यासाठी फक्त नाचणी आणि हरभरे एक दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवावे लागतात 

कृती : नाचणी २४ तास पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी काढून नाचणी ओल्या मलमलच्या कपड्यात गुंडाळून उबदार ठिकाणी ठेवा.

दोन दिवसांनंतर नाचणीला कोंब येतील 

नाचणीची कोशिंबीर करताना चिरलेले बदाम, काळे मनुके, गूळ पावडर, तीळ, मोड आलेली नाचणी घ्यायची आहे

या कोशिंबिरीत अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात 

हरभाऱ्यांमुळे पचन सुलभ होते. आतड्यांचे कार्य सुधारते 

नाचणीमधील फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात, तसेच हृदयासाठी ते उपयोगी असतात 

याचे गरम पाण्याचा वापर करून सूपदेखील करता येते 

याव्यतिरिक्त या सारणाचा वापर नाचणीची इडली, डोसा, दलिया इत्यादी विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.