(Photo: Unsplash)

हिवाळ्यात  घसा–छाती शांत ठेवण्यास ‘हे’ ८ भारतीय घरगुती घटक आरोग्यदायी

Nov 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

काळी मिरी

काळी मिरी शरीरात ऊब वाढवून, श्वसनमार्ग मोकळे करते. तसेच घशातील खवखव आणि छातीतील जडपणा कमी करण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

आले

आले नैसर्गिक एक्स्पेक्टरंट असून, त्यामुळे कफ सैल होतो. आल्याचा चहा प्रदूषण किंवा थंडीमुळे होणारी छातीची जळजळ आणि खोकला आटोक्यात ठेवतो.

(Photo: Unsplash)

मध

मध घशावर हलकी थर तयार करून, खवखव कमी करतो. कोरडा खोकला शांत करण्यासाठी उपयुक्त.

(Photo: Unsplash)

गूळ

गूळ शरीर गरम ठेवतो आणि फुप्फुसातील खवखव कमी करतो. हिवाळ्यात गूळ-आले किंवा गूळ-तीळ खाणे विशेष फायदेशीर.

(Photo: Unsplash)

ओवा 

ओवा श्वसनमार्ग उघडतो आणि खवखव कमी करतो. ओव्याची वाफ घेतल्यास छातीतील जडपणा कमी होतो.

(Photo: Unsplash)

तुळस

तुळशीची पाने घशातील सूज कमी करतात. तुळशीचा काढा किंवा चहा खूप उपयोगी ठरतो.

(Photo: Unsplash)

 हळद

हळदीतील करक्यूमिन श्वसनमार्गातील सूज कमी करतो. गरम हळदीचे दूध किंवा हळदीचे पाणी घशाला तत्काळ आराम देते.

(Photo: Unsplash)

 ज्येष्ठमध

ज्येष्ठमध घसा शांत करून, कोरडा खोकला कमी करतो. मूलेठीचा हलका चहा छातीतील दाह कमी करण्यास उपुयुक्त.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नवीन भाषा शिकू इच्छिता? ‘या’ सातत्यपूर्ण सवयी करतील मदत